Avinash Bhondwe

Avinash Bhondwe A page devoted to my work in Health Literacy @ Awareness

या वर्षीचा उन्हाळा खूप असह्य आहे. त्यामध्ये इतर आजार त्र होत आहेतच, पण डीहायड्रेशन आणि सन स्ट्रोकचे रुग्णही वाढतायत. उन्...
21/05/2026

या वर्षीचा उन्हाळा खूप असह्य आहे. त्यामध्ये इतर आजार त्र होत आहेतच, पण डीहायड्रेशन आणि सन स्ट्रोकचे रुग्णही वाढतायत. उन्हाळ्यातल्या काही आजारांबद्दल आणि त्याबद्दल काय काळजी घ्यावी याबद्दल माझी मुलाखत. Top20news.in दि. २१मे २०२६.

TOP NEWS MARATHI : WHAT IS CARE OF IN SUMMER | SUMMER : उन्हाळ्यात नेमकी काय घ्यावी काळजी ?यंदाच्या उन्हाळा 149 वर्षांत सर्वाधिक तप्त उष्माघात म्हणज...

मधुमेहाचे रुग्ण का वाढत जातायत? याविषयी माझा लेख 'कृष्णप्रभू' त्रैमासिक मे 2026.
19/05/2026

मधुमेहाचे रुग्ण का वाढत जातायत? याविषयी माझा लेख 'कृष्णप्रभू' त्रैमासिक मे 2026.

15/05/2026

🔵रंग माझा वेगळा🟣

गोष्ट ग्राम स्टेनची

● शोधकर्ता स्वतःच तिला “दोषपूर्ण आणि अपूर्ण पद्धत” म्हणाला होता
● नंतर जरी बॅक्टेरियांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरली गेली, तरी तिचा मूळ उद्देश फक्त बॅक्टेरिया दिसावेत इतकाच होता.
● या शोधामागे जाणीवपूर्वक योजना कमी आणि योगायोगाचा वाटा मोठा होता.
● पार्श्वभूमीला एक वादही होता.

तरीसुद्धा, १४० वर्षांइतका दीर्घ काळ लोटल्यानंतरही ग्राम स्टेनिंग ही बॅक्टेरिया ओळखण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे.

“ग्राम स्टेन”मधील “ग्राम” म्हणजे Hans Christian Gram — १८८४ मध्ये बर्लिन, जर्मनी येथील म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना ही स्टेनिंग पद्धत विकसित करणारे डॅनिश फिजिशियन.
मूळचे डेन्मार्कची राजधानीतील, म्हणजेच कोपनहेगनचे.
ग्राम यांनी सुरुवातीला वनस्पतिशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांना मायक्रोस्कोपी मधे खास रुची होती.
पर्निशियस अ‍ॅनिमियामध्ये मोठ्या आकाराच्या लाल रक्तपेशी (macrocytosis) आढळतात, हे निरीक्षण मांडण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. ग्रामचा
डॉक्टरेटचा विषय हाच होता.

त्या काळात युरोपमध्ये वैद्यकीय विज्ञान झपाट्याने प्रगती करत होते.
बर्लिन हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागात डॉ. कार्ल फ्रेडलंडर न्यूमोनियाने मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा अभ्यास करत होते.
त्यांनी मृत रुग्णांच्या फुफ्फुसांमधून कॅप्सूलयुक्त दंडगोलाकार जीवाणू (capsulated bacillus) वेगळा केला होता आणि तोच न्यूमोनियाचा मुख्य कारणीभूत बॅक्टेरिया असल्याचा दावाही पेश केला.(आता या बॅक्टेरियाचे नाव आहे Klebsiella pneumoniae)
परंतु दुसरे पॅथॉलॉजिस्ट Albert Fraenkel यांचे मत वेगळे होते. त्यांच्या मते खरा कारणीभूत होता तो न्यूमोकोकस.
(आताचा Streptococcus pneumoniae)
वाद अधिकच तीव्र झाला, कारण सूज आलेल्या फुफ्फुसांमधे कोणतेच बॅक्टेरिया स्पष्टपणे दाखवता येत नव्हते. त्या काळातील उपलब्ध स्टेनिंग पद्धत हे काम करायला असमर्थ होती.

एका रात्री ग्राम हे जेन्टियन व्हायोलेट (क्रिस्टल व्हायोलेट) ने रंगवलेल्या फुफ्फुसांच्या टिश्यूवर काम करत होते. त्यांनी त्या स्लाइड्सवर आयोडीन द्रावण टाकले आणि नंतर अल्कोहोलने धुतले. हा क्रम मुद्दाम केला की योगायोगाने घडला, हे आजही निश्चित सांगता येत नाही.
पण परिणाम आश्चर्यकारक होता !
काही जीवाणूंनी जांभळा रंग कायम ठेवला, तर काही पूर्णपणे रंगहीन झाले. गोलाकार जीवाणू (cocci) गडद जांभळे राहिले, तर अनेक दंडगोलाकार जीवाणूंचा रंग निघून गेला.
हा क्षण वैद्यकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. ग्राम यांनी अशी पद्धत विकसित केली होती ज्यामुळे प्रथमच टिश्यूंमधील बॅक्टेरिया स्पष्ट दिसू लागले. विशेष म्हणजे न्यूमोनियाग्रस्त फुफ्फुसांमध्ये cocci(round shaped) आणि bacilli (Rod shaped) असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया दिसत होते — म्हणजेच एकापेक्षा अधिक बॅक्टेरिया प्राणघातक न्यूमोनियास कारणीभूत ठरू शकतात हे उघड होते.
मूळ वाद अशा रितीने निकालातच निघाला.

इतक्या मोठ्या शोधानंतरही ग्राम अत्यंत विनम्र होते. कोणतेही मोठे दावे तर डॉक्टर ग्रामनी केलेच नाहीत उलट आपल्या १८८४ च्या मूळ लेखात त्यांनी लिहिले :
“मला याची जाणीव आहे की ही पद्धत अद्याप दोषपूर्ण आणि अपूर्ण आहे; पण तरीही इतर संशोधकांच्या हातात ती उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.”
त्यांच्या या “अपूर्ण स्टेनिंग सिस्टीमने" सर्व अपेक्षा मात्र ओलांडल्या !
बॅक्टेरियांच्या बेसिक क्लासिफिकेशनसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरली. जांभळा रंग टिकवून ठेवणाऱ्या बॅक्टेरियांना(🔵) Gram-positive तर रंग गमावणाऱ्यांना Gram-negative असे संबोधले जाऊ लागले.
1886 मध्ये Carl Weigert यांनी safranin हे counterstain वापरण्याची पद्धत सुरू केली, ज्यामुळे Gram-negative बॅक्टेरिया गुलाबी किंवा लाल रंगात दिसू लागले.
(🟣)

१८८९ पर्यंत ग्राम स्टेनिंग मायक्रोबायोलॉजीच्या टेक्स्ट बुक्समधे दाखल झाले होते आणि बॅक्टेरिया ओळखण्यासाठीची ती अत्यावश्यक लॅब टेस्ट बनली होती. कल्चर पद्धतीपेक्षा ती स्वस्त आणि जलद होती.

बर्लिनमधील अल्प वास्तव्यानंतर डॉक्टर ग्राम कोपनहेगनला परतले. तेथे त्यांनी फारमॅकोलाॅजी आणि मेडिसिनचे अध्यापन केले. ते अत्यंत कुशल चिकित्सक म्हणून प्रसिद्ध झाले आणि पुढे डेन्मार्कच्या राजघराण्याचे फिजिशियन म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. त्यांची यशस्वी वैद्यकीय कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ चालली.

विशेष म्हणजे, आपल्या नावाने अमर झालेल्या या स्टेनिंग मेथडवर ग्राम यांनी पुढे कोणताही रस कधीच दाखवला नाही.

पण आजही इतके अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही ग्राम स्टेनिंग ही बॅक्टेरियाची प्राथमिक ओळख आणि वर्गीकरण
(Identification and classification) करण्यासाठीची जलद, स्वस्त आणि विश्वासार्ह पद्धत मानली जाते.
अजून एक खास बाब ही की १८८४ पासूनचे हे तंत्र आजही तसेच्या तसेच वापरात आहे.

हा रंग…
फिका पडायलाच तयार नाही !
🔵🟣

Dr Pradnya Rotithor
14/5/2026

वजन कमी करण्यासाठी, व्यायामासोबत दररोजच्या आहारातून शरीराला मिळणाऱ्या कॅलरीजचाही हिशेब सांभाळावा लागतो. आपल्या दैनंदिन आ...
08/05/2026

वजन कमी करण्यासाठी, व्यायामासोबत दररोजच्या आहारातून शरीराला मिळणाऱ्या कॅलरीजचाही हिशेब सांभाळावा लागतो. आपल्या दैनंदिन आहारातील पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात, याची कल्पना अनेकांना नसते. त्यासाठी रोजच्या आहारातील कॅलरीजचे प्रमाण समजावणारा हा लेख. Vivek saptahik - साप्ताहिक विवेक दि. ४ मे २०२६.

सध्याच्या कडक उन्हाळ्यात आरोग्याची काय काळजी घ्यावी? या बाबत माझा लेख, @ग्राहकहित मे विशेषांक.
05/05/2026

सध्याच्या कडक उन्हाळ्यात आरोग्याची काय काळजी घ्यावी? या बाबत माझा लेख, @ग्राहकहित मे विशेषांक.

रोजच्या खाण्यामध्ये कुठले पदार्थ असावेत आणि कोणत्या पदार्थांना चार हात दूर ठेवणे आवश्यक असते? याचे भान राखणे आवश्यक असते...
30/04/2026

रोजच्या खाण्यामध्ये कुठले पदार्थ असावेत आणि कोणत्या पदार्थांना चार हात दूर ठेवणे आवश्यक असते? याचे भान राखणे आवश्यक असते. Vivek saptahik - साप्ताहिक विवेक मधील 'चला वजन कमी करू या' सदरामधील पुढचा लेख. जरूर वाचा. प्रतिक्रिया कळवा.

क्षय रोगाच्या निर्मूलनासाठी विशेष मोहीम. जगात सर्वात जास्त क्षयरोगी भारतात आहेत. नव्या पहाणीमध्ये महाराष्ट्रातही ६ हजारा...
28/04/2026

क्षय रोगाच्या निर्मूलनासाठी विशेष मोहीम. जगात सर्वात जास्त क्षयरोगी भारतात आहेत. नव्या पहाणीमध्ये महाराष्ट्रातही ६ हजारापेक्षा जास्त क्षय रोगी आढळले आहेत. या विषयीचा हा विशेष व्हिडिओ जरुर पहा.

28 likes, 2 comments. "Maharashtra TB Crisis | चिंताजनक ! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; तब्बल 11 हजार गावांना हायअलर्ट"

पौगंडावस्था, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या तिन्ही काळात स्त्रियांचे वजन वाढत जाते. या सर्व टप्प्यात वजन वाढू न देणे गरजेच...
24/04/2026

पौगंडावस्था, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या तिन्ही काळात स्त्रियांचे वजन वाढत जाते. या सर्व टप्प्यात वजन वाढू न देणे गरजेचे असते. माझा याबाबत लेख, 'स्त्रियांमधील स्थूलत्व' Vivek saptahik - साप्ताहिक विवेक 'चला वजन कमी करू या', लेखमालेतील लेखांक १३ वा.

आरोग्यमय पद्धतीने वजन कमी करताना फक्त कॅलरीजचा विचार करून चालत नाही. कमी कॅलरीज, पण संतुलित आहार घेणे आवश्यक असते. 'चला ...
14/04/2026

आरोग्यमय पद्धतीने वजन कमी करताना फक्त कॅलरीजचा विचार करून चालत नाही. कमी कॅलरीज, पण संतुलित आहार घेणे आवश्यक असते. 'चला वजन कमी करूया ' या लेखमालेतील नवा लेख. Vivek saptahik - साप्ताहिक विवेक

ऍनिमल फार्म आणि 1984 या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म बिहारमधल्या मोतिहारी गावात झाला होता. त्या ज...
11/04/2026

ऍनिमल फार्म आणि 1984 या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक जॉर्ज ऑरवेल यांचा जन्म बिहारमधल्या मोतिहारी गावात झाला होता. त्या जागेची छायाचित्रे पहा.

Explore this post and more from the Indianbooks community

Address

9, Nisarga Apts, 781/2 Erandavane, Opp. Kamla Nehru Park, Deccan Gymkhana
Pune
411004

Telephone

+919823087561

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Bhondwe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Avinash Bhondwe:

Share