26/05/2026
👉पॅनऑर्थोतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती उपक्रम | रोबोटिक स्पाईन उपचारांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन 🏥 🩺
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, शब्दरंग कला साहित्य कट्टा, भजनी महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (महिला विभाग) आणि पॅनऑर्थो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य जनजागृती व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांशी आरोग्यविषयक संवाद आयोजित करण्यात आला. निरोगी जीवनशैली, आजारांपासून बचाव, आधुनिक उपचार पद्धती आणि आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे रोबोटिक नी रिप्लेसमेंट आणि रोबोटिक स्पाईन उपचार प्रणालीचे उद्घाटन व प्रात्यक्षिक. आधुनिक डिजिटल व रोबोटिक तंत्रज्ञानामुळे उपचारांमध्ये अधिक अचूकता, सुरक्षितता आणि यशाचे प्रमाण वाढत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलिस अधिकारी अतुल पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा सभापती कैलास कुटे, विविध नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी आणि पॅनऑर्थो हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. उमेश जाधव, डॉ. गीतांजली जाधव, डॉ. एस. प्रशांत, डॉ. राहुल बोंदे, डॉ. वेदश्री प्रशांत, डॉ. मंदार आचार्य, डॉ. अपर्णा आचार्य, डॉ. विशाल मोहिते आदी डॉक्टरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी “कुटुंब आरोग्य रक्षक कार्ड” योजनेचाही शुभारंभ करण्यात आला.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वाती शिरूरकर यांनी प्रथम, सुनीता भंगाळे यांनी द्वितीय तर सुजाता चिटणीस यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यजागृतीसाठी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
📌PanOrtho Hospital
📞 +91 74477 80000
🌐 www.panortho.com