27/05/2026
पेस ही स्वयंसेवी संस्था आहे.जी व्यसन विरोधी अभियानाअंतर्गत
शालेय व महाविद्यालयीन मुलांमध्ये व्यसनाबाबत जनजागृतीचा कार्यक्रम राबवते. ८वी ते १२ वी
वयोगटातील महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे.
सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घ्यायला परवानगी मिळालेली आहे. ज्यात
शाळांमधून मुलांना पीपीटी आणि दोन लघु फिल्म दाखवल्या जातात. त्यानंतर मुलांकडून शपथ घेतली जाते. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातात.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात काम करायला स्वंयसेवक पाहिजे आहेत.
गरजू स्वयंसेवकांना पेस तर्फे मानधन दिले जाते.
कार्यकर्त्यांचे ट्रेनिंग दिले जाते.
ज्यांना हे काम करण्याची मनापासून तयारी आहे अशा पदवीधर लोकांनी संपर्क करावा. मुलांसमोर अथवा गटासमोर बोलायची सवय पाहिजे, थोडे हिंडावे लागेल, शाळाही संपर्क करावा लागेल ती क्षमता असावी.हे काम जबाबदारीचे आणि नेकीने करणारे लोक पाहिजेत. काही भागातील लोकांनी खोटे आणि चुकीचे काम केले हे जाणवल्याने ,खेदाने हे लिहावे लागत आहे.
सोबत पेस संस्थेची वेबसाइट जोडत आहे जे इच्छुक असतील त्यांनी संपर्क करावा.
https://www.paceantiaddictiondrive.org/
Ashwini tambe
समन्वयक पेस ग्रूप
PACE NGO is a group of doctors, medical students & interns, psychologists, volunteers & social workers, who are working to prevent addictions to to***co & related substances.