Anubhuti - Nurturing Young Minds

Anubhuti - Nurturing Young Minds A Team of Social Entrepreneurs We believe in Anubhuti: Learning here is experiential.

We at Anubhuti firmly believe that:
• Thoughts and Attitude largely define a personality
• Both can be moulded as a mind never really grows old

We are a group of young minds working collectively to help ourselves become better human beings. We also assist willing individuals to expand reform or refurbish their horizons of thoughts and choose the optimistic route anywhere and everywhere. Anubhuti occurs through discussions, brain storming sessions and a variety of other enlightening activities.

3 Days of Mindful Livingछोट्या सवयी ज्या आयुष्य आमूलाग्र बदलतात...          Students Parents ITProfessionals🪷 रोजची कामं...
30/07/2026

3 Days of Mindful Living
छोट्या सवयी ज्या आयुष्य आमूलाग्र बदलतात...

Students Parents ITProfessionals

🪷 रोजची कामं करता करता हा ३ दिवसांचा उपक्रम नक्की करा...

✅ मन शांत आणि स्वस्थ करण्यासाठी
✅ ताण, अतिविचार आणि स्क्रीनच्या अतिवापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी
✅ दैनंदिन जीवनात Mindfulness आणि Gratitude आणण्यासाठी
✅ छोट्या-छोट्या कृतींमधून कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवण्यासाठी

🪷 हा उपक्रम १८ वर्षांपुढील सर्वांसाठी आहे.

🪷 Pause The Mind For 40 Minutes या सेशननंतर हा ३ दिवसांचा उपक्रम केल्यास त्याचा अधिक चांगला अनुभव येतो.

🪷 दररोज फक्त १० ते १५ मिनिटं जागरूकपणे स्वतःसाठी दिली तरी मन आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल अनुभवता येतो.

🪷 या उपक्रमामध्ये ३ दिवसांसाठी...
🌿 काही Mindfulness च्या activities आहेत.
🌿 काही Gratitudeच्या activities आहेत.

🪷 हा उपक्रम घरबसल्या करता येतो.

📞 *अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर आजच संपर्क साधा.*
94034 56434
98500 89060

GratitudeVibes!✨️
29/07/2026

GratitudeVibes!✨️

Seeds of Hope 🪷आईची एकच इच्छा असते — माझ्या मुलाचं आयुष्य सुख आणि समाधानाने भरलेलं असावं. याच भावनेतून तयार झालेलं आहे S...
28/07/2026

Seeds of Hope 🪷

आईची एकच इच्छा असते — माझ्या मुलाचं आयुष्य सुख आणि समाधानाने भरलेलं असावं. याच भावनेतून तयार झालेलं आहे Seeds of Hope हे सेशन ...

या सेशनमध्ये, अनुभूतीच्या शांत आणि सकारात्मक वातावरणात, अनुभूती टीमसोबत तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करता…

हे केवळ एक सेशन नाही आहे... तर आईच्या हृदयाला स्पर्श करणारी ही एक आगळीवेगळी अनुभूती आहे.

📞 *सेशनच्या नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:*
94034 56434,
98500 89060

The best investment we ever make in our health is consistent exercise. Rather than paying hospital bills later, taking o...
27/07/2026

The best investment we ever make in our health is consistent exercise. Rather than paying hospital bills later, taking out some time to maintain good health is relatively much easy.

But...

We keep giving excuses. This week, let's promise ourselves to invest just 10 minutes every day to feel healthier and happier!

If you need help in improving your consistency, Team Anubhuti is always there to help... :)

Pause the Mind for 40 MinutesMindfull to Mindfulया अनुभूतीच्या customised session चा मी recently अनुभव घेतला. माझ्यासाठी...
26/07/2026

Pause the Mind for 40 Minutes
Mindfull to Mindful
या अनुभूतीच्या customised session चा मी recently अनुभव घेतला. माझ्यासाठी हे session म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळी अनुभूती ठरली. मनातला तणाव, मरगळ, मळभ, negativity या सर्व गोष्टी या सेशन मधून हळू हळू, step by step पण इतक्या प्रभावी पद्धतीने हाताळल्या गेल्या आणि बघता बघता खरचंच मन mindful, शांत, हलकं आणि positive होत गेलं.

Session सुरू होण्यापूर्वीच सर्व तयारी केलेली होती. त्यातूनही हे जाणवत होतं की या सेशनच्या planning आणि ex*****on मागे एक kindness, आपुलकी, प्रेम आणि 'तुम्ही एकटे नाही आहात, अनुभूती तुमच्या बरोबर आहे’ ही आधाराची भावना आहे. या session मधला माझा key takeaway म्हणजे हे वाक्य होतं की परिस्थिती बदलायच्या मागे लागण्यापेक्षा मनस्थिती बदलायचा प्रयत्न करा. अनुभूती टीम तर आहेच आणि इथली ऊर्जा सुद्धा तुमच्या बरोबर आहे.

Session संपल्यावर मलाच माझ्यातलाच खूप positive बदल जाणवला. खूप शांत आणि बरं वाटलं. स्वतःला बदलण्याच्या या अवघड प्रयत्नात ‘अनुभूती’ आपल्या बरोबर आहे याचा खूप आधार वाटला आणि असं जाणवलं की मनानी ठरवलं तर आपल्याला आपल्यातला हा बदल करणं खरतर खूप सोपं आहे. ठरवणारे पण आपणच आहोत आणि follow करणारे पण आपणच.

या session मुळे Mindfulness कडे माझं एक पाऊल पुढे पडलं असं नक्कीच म्हणता येईल. Thank you dada and Anubhuti Team!

Dr. Amruta Kulkarni
HOD German Department
Ferguson College

We often measure success by how much we did, but not how well we did it.A single task completed with pure attention can ...
23/07/2026

We often measure success by how much we did, but not how well we did it.
A single task completed with pure attention can have a far greater impact than ten things rushed through.
plore

GratitudeVibes! ✨️
22/07/2026

GratitudeVibes! ✨️

3 Important tips to recharge yourself! 😊
20/07/2026

3 Important tips to recharge yourself! 😊

कृतज्ञता – एक अत्यंत प्रभावी emotionकृतज्ञता ही एक अत्यंत ताकदवान भावना आहे. सध्याच्या काळात ज्या एका भावनेची मनापासून आ...
18/07/2026

कृतज्ञता – एक अत्यंत प्रभावी emotion

कृतज्ञता ही एक अत्यंत ताकदवान भावना आहे. सध्याच्या काळात ज्या एका भावनेची मनापासून आराधना करावी, अशी ही भावना आहे.

ही भावना मला आधी माहीत नव्हती का? तर तसं नाही आहे. या भावनेचा प्रत्यय याआधी कधीच आला नव्हता का? तर तसंही नाही आहे. पण या भावनेची आराधना केली, तर आपल्या सगळ्या तक्रारी आपला समूळ पिच्छा सोडू लागतात आणि आपण एक सकारात्मक आयुष्य जगायला लागतो, हे मला अनुभूतीमध्ये समजलं.

हा एक अभ्यास आहे आणि तो इतर कोणत्याही अभ्यासासारखाच आहे. कधी सहज जमतो, कधी अजिबात जमत नाही. कधी खूप प्रयत्न करूनही काही घडत नाही, तर कधी एका क्षणात अंतर्मन बदलून जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कधी मनापासून कृतज्ञ वाटेल हे आपण ठरवू शकत नाही. खरं तर मनापासून कृतज्ञ वाटणं हीसुद्धा त्या भगवंताची, ऊर्जेची आपल्यावर झालेली कृपाच आहे.

मी एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतो. २०२४ च्या निवडणुकांमध्ये माझी निवडणूक ड्युटी लागली. तीही जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री परिसरात. एका फेरीसाठीच चार तासांचा प्रवास आणि असे तीन वेळा जावं लागणार होतं. "हे आपलं काम नाही, तरीही करावं लागतंय," या विचारामुळे मनात खूप तक्रारी होत्या. माझा self-talk पूर्णपणे नकारात्मक झाला होता.

निवडणुकीच्या दिवशी आमचं मतदान केंद्र निश्चित झालं. माझ्यासोबतची टीमही समजली. बसऐवजी आम्हांला जीपने नेण्यात आलं. मी Presiding Officer असल्यामुळे सगळे माझ्याशी अगदी आदराने वागत होते.

जीप एका वळणावर आली आणि अचानक समोर उलगडलेलं निसर्गाचं ते अप्रतिम रूप... त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. त्या छोट्याशा गावात आमचं अतिशय प्रेमाने स्वागत झालं. त्यांनी आमची मनापासून काळजी घेतली. एक-एक गोष्ट मनाला स्पर्शून गेली.

परतीच्या प्रवासापर्यंत माझ्या मनात कृतज्ञतेची भावना इतकी वाढली होती की मला तिथे पाठवल्याबद्दल माझ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाबद्दलही मनापासून कृतज्ञता वाटत होती. ज्या तक्रारी घेऊन मी गेलो होतो, त्या सर्व नाहीशा झाल्या होत्या. हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता.

तेव्हाच मनात एक विचार अगदी ठाम झाला, जर ही भावना कायम मनात राहिली, तर आयुष्य किती सुंदर होईल! मग आपल्या आयुष्यातल्या तक्रारी पूर्णपणे संपून जातील.

त्या दिवसापासून मी माझ्या रोजच्या आयुष्यात कृतज्ञतेचा अभ्यास करायला, म्हणजेच या भावनेची आराधना करायला सुरुवात केली. आज माझ्या दिवसाचा बराचसा भाग या भावनेत जातो. अर्थात, मधेच दुधात मिठाचा खडा पडावा तसे काही प्रसंग येतात आणि काही दिवस अभ्यास विस्कटतो. पण पुन्हा त्याच मार्गावर परतण्याचा प्रयत्न स

Confidence doesn't grow overnight. You need to take a lot of efforts, break many comfort zones, push yourself beyond you...
17/07/2026

Confidence doesn't grow overnight. You need to take a lot of efforts, break many comfort zones, push yourself beyond your limits and keep moving forward one step at a time.

If you wish to feel more confident and more in control of your life, we are just a call away. Feel free to reach out.

94034 56434, 98500 89060

Address

Karvenagar
Pune
411052

Opening Hours

Monday 8am - 9am
4pm - 7:30pm
Tuesday 8am - 9am
4pm - 7:30pm
Wednesday 8am - 9am
4pm - 7:30pm
Thursday 8am - 9am
4pm - 7:30pm
Friday 8am - 9am
4pm - 7:30pm
Saturday 8am - 9am
1:30pm - 6:30pm

Telephone

+919527086670

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anubhuti - Nurturing Young Minds posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anubhuti - Nurturing Young Minds:

Shortcuts

Share