24/07/2026
🤰 Pregnancy & Fasting | प्रेग्नेंसी आणि उपवास 🙏
Fasting has been an integral part of our culture for centuries. Modern medicine is also exploring the effects of fasting on health, including its possible role in conditions like cancer. However, there is no conclusive evidence to recommend fasting as a treatment, and pregnancy is a completely different situation.
During pregnancy, your baby continuously receives nutrition from you. Even if you fast, your baby’s nutritional needs do not stop. Prolonged fasting can lead to the formation of ketones, which are generally best avoided during pregnancy. Therefore, routine fasting is not recommended for most pregnant women.
Another important point…
Today, many of us associate fasting with foods like sabudana (tapioca pearls). Interestingly, sabudana became popular in India only in the early 20th century. Traditionally, fasting was never synonymous with eating large quantities of sabudana. Nutritionally, it is rich in carbohydrates but low in protein, fibre, and several essential micronutrients. So, replacing a balanced meal with large portions of sabudana is not the healthiest choice.
🙏 If you wish to observe your faith during pregnancy, offer your prayers with devotion, nourish yourself well, and take care of your growing baby. Your health and your baby’s well-being are the greatest offerings.
आपल्या संस्कृतीमध्ये उपवासाला प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे. आधुनिक वैद्यकातही उपवासाचे शरीरावर होणारे परिणाम आणि काही आजारांमधील संभाव्य भूमिका यावर संशोधन सुरू आहे. मात्र उपवास हा कोणत्याही आजारावरील सिद्ध उपचार नाही, आणि गर्भावस्था हा पूर्णपणे वेगळा काळ आहे.
गर्भावस्थेत तुमचं बाळ सतत तुमच्याकडून पोषण घेत असतं. तुम्ही उपवास केला तरी बाळाच्या गरजा थांबत नाहीत. दीर्घकाळ उपाशी राहिल्यास शरीरात ketones तयार होऊ शकतात, जे गर्भावस्थेत टाळणं योग्य मानलं जातं. म्हणूनच प्रेग्नेंसीमध्ये नियमित उपवास करण्याची शिफारस केली जात नाही.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट…
आजकाल उपवास म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर साबुदाणा येतो. पण साबुदाणा भारतात विसाव्या शतकात लोकप्रिय झाला. आपल्या पारंपरिक उपवासाचा तो हजारो वर्षांचा भाग नव्हता. पोषणाच्या दृष्टीने साबुदाणा हा मुख्यतः कार्बोहायड्रेटयुक्त असून त्यात प्रथिने, तंतू (फायबर) आणि अनेक आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वे कमी असतात. त्यामुळे फक्त साबुदाण्यावर आधारित उपवास हा आरोग्यदायी पर्याय ठरत नाही.
🙏 गर्भावस्थेत श्रद्धा जपा, पण स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घ्या. मनापासून देवाची प्रार्थना करा, पौष्टिक आहार घ्या आणि निरोगी गर्भधारणेचा आनंद घ्या.
Happy Pregnancy. Happy Birthing. 🌸