Ayurved for Cancer

Call Directions Website Contact the practice

Ayurved for Cancer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayurved for Cancer, Medical Research Center, Bharatiya Sanskriti Darshant Trust's Integrated Cancer Treatment and Research Centre, Kesnand Road, Wagholi, Pune.

ICTRC - Integrated Cancer Treatment & Reseach Centre : Integrative Cancer treatment under one roof by means of Ayurveda - Panchakarma & Allopathy (Chemotherapy, Radiotherapy, Surgery) to improve Quality of Life, to enhance longecity. The Multi centric project having it's wings at Wagholi (Pune), Dadar (Mumbai), Solapur, Kolhapur, Aurangabad, Ahmednagar & Bangalore.
• Integration of Chemotherapy, Radiotherapy and Surgery along with Ayurvedic treatment to improve the Quality of life of Cancer Patients.
• Imparting Ayurvedic Treatment like Shaman (Oral Ayurvedic Treatment), Rasayana (Rejuvenating Treatment) and Panchakarma (Detoxifying Treatment) for controlling progression of the disease and increasing resistance against the disease.
• Availability of Satellite Cancer Detection & Treatment facilities under the guidance of experts in respective fields.
• Identifying risk factors of Cancer from Ayurvedic point of view and thus emphasizing awareness on lifestyle modification for prevention of Cancer in the society.

Liver Cancer Awareness Month (October 2026)Every year, moth of October is observed worldwide as “Liver Cancer Awareness ...
03/10/2026

Liver Cancer Awareness Month (October 2026)

Every year, moth of October is observed worldwide as “Liver Cancer Awareness Month” to raise awareness about liver cancer, its risk factors, and the importance of prevention and early detection.

Hepatocellular carcinoma (HCC) is the most common primary liver cancer, accounting for 75% to 85% of cases. Other types include cholangiocarcinoma (bile duct cancer).

Risk Factors for Liver Cancer
 Chronic viral hepatitis (Hepatitis B and Hepatitis C)
 Liver cirrhosis (scarring of the liver)
 Excessive and frequent alcohol consumption
 Metabolic dysfunction

Among which, chronic hepatitis B is one of the leading risk factors for liver cancer worldwide. Nearly 300 million people live with chronic hepatitis B, which can cause long-term liver damage and increase the risk of liver cancer—even without cirrhosis.

Importance of screening and life style modification
Early-stage liver cancer often shows no clear symptoms. Thus, regular screening is essential for people with liver disease or cirrhosis.

Regular medical check-ups, appropriate treatment, liver cancer screening, and healthy lifestyle choices can help to reduce the risk of liver cancer.

Bharatiya Sanskriti Darshan Trust's
INTEGRATED CANCER TREATMENT AND RESEARCH CENTRE
"Vishwashanti Dham", Kesnand Road, Wagholi, Pune - 412207.
Ph.Nos.: 020-67346000 / 9545508890
E-mail: [email protected]

E-mail: www.ayurved-for-cancer.org
YouTube:
Facebook: AyurvedforCancer
Instagram: ayurved.for.cancer

14/09/2026
25/08/2026

धागा धागा अखंड विणूया: भाग ४

अन्न हे पूर्णब्रह्म. भारताच्या प्राचीन शास्त्राने आपल्या संस्कारातून किती चांगल्या पद्धती अन्नासाठी निर्माण झाल्यात याचा विचार करून आश्चर्य वाटते. अन्नधान्य भाजीपाला फुले फळे हे आपल्या कामासाठी तोडण्यापूर्वी आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करणे आवश्यक आहे. तसेच अन्न दळताना , भाजीपाला कापताना आणि तयार करताना चांगल्या मनाने सर्व प्रकारच्या स्वच्छतेची काळजी घेऊन मनापासून अन्न शिजवल्यास त्यामध्ये सत्व आणि ऊर्जा पुष्कळ जास्त टिकते. अन्न शिळे झाल्यानंतर त्याची कॅलरी व्हॅल्यू जरी कायम असली तरी त्यातील आधुनिक शास्त्राला न मोजता येणाऱ्या सूक्ष्म द्रव्यांची प्राणशक्ती कमी कमी होत जाते. म्हणून आपण ताज्या अन्नाला महत्त्व देतो. अन्न वाढताना सुद्धा ते वाढणाऱ्याची मनस्थिती, उद्देश, विचार पद्धती आणि सेवावृत्ती फार महत्त्वाची असते. अस्वच्छ पणे अन्न घाईघाईत, हॉटेल सारखे व्यापारी दृष्टीने बनवल्यास आणि कृत्रिम पणे हसत खेळत किंवा रागाने वाढल्यास, ऑनलाइन मागवल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होईल याचा विचार करणे जरूर आहे. औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे अन्नातील प्राण आणि ऊर्जा कमजोर होत आहे. त्यात परत दूषित वातावरण, दूषित अन्न, दूषित हवा, दूषित पाणी, दूषित विचार या सर्वांचा अधिकाधिक विघातक परिणाम चालूच आहे. रस्त्यावरचे किंवा हॉटेलमधले अन्न बऱ्याच लोकांना त्यांच्या कामानिमित्त खाणे भाग पडते. परंतु वाढत्या चंगळवादामुळे आपण गरज नसताना लक्झुरिअस लाइफस्टाईल कडे वळत आहोत. लक्झुरिअस लाइफस्टाइल वाईट नाही परंतु परवडत नसताना आपला रुबाब वाढवण्यासाठी आणि लोकांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी केलेला प्रयत्न हा बरोबर आहे का? घरच्या अन्नाला तुच्छ लेखन बाहेर मजा मारणे योग्य नाही. खरोखर गरज असल्यास जे करणे योग्य वाटेल ते करायला लागेलच. तरुणाईत संस्कारहीन अयोग्य सवयी लागल्यामुळे आपल्या आरोग्यदायी जीवन पद्धतीचा ऱ्हास होत चाललेला आहे.
आजीबाईचा बटवा म्हणून आपण जुन्या भारतीय वैद्यशास्त्राची सध्याच्या काळात टिंगल करू शकतो. परंतु जुन्या काळातील त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. सर्दी खोकला ताप अंग दुखी अपचन डोकेदुखी इत्यादी अनेक साध्या दैनंदिन आजारावर उपाय म्हणून घरच्या घरी अनेक परंपरागत चालत आलेल्या उपचार पद्धतींचा चांगला उपयोग होत होता. दर वेळा घाई घाई ने दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घेण्याची गरज लागत नसे. ताप आल्यास एक दिवस उपवास, हलका आहार, विश्रांती आणि सुविचार यामुळे बहुसंख्य वेळेला घरच्या घरीच उपाय होत असे. सर्दी ताप खोकला अंगदुखी डोकेदुखी हे सिम्प्टम्स म्हणजे खरा रोग नाही. आपल्या शरीराच्या आत रोग प्रादुर्भाव करत आहे याचा हा बाहेरील पुरावा. लहान मुल भुकेमुळे रडते, त्याचे रडणे कमी करण्यासाठी त्याच्या तोंडात नुसते दुधाच्या बाटलीचे बोंड सरकवून काम होणार नाही. त्याला योग्य त्या दुधाचा किंवा अन्नाचाच घास भरावा लागेल. मुलाला दुसरा काही त्रास नाही ना हे पण प्रथम बघणे आवश्यक ठरेल. त्याचप्रमाणे केवळ गोळ्या इंजेक्शनने बाहेरील सिम्प्टम थांबवून आतला रोग बरा होऊ शकणार नाही. यामुळे आपण सावधान राहून अंतर्गत विद्रोहाचा बंदोबस्त केला पाहिजे.
घाई घाईने दरवेळी फॉर्मॅस्युटिकल गोळ्या खाऊन धोक्याची घंटी तात्पुरती बंद करणे हे कितपत योग्य आहे. यामुळे निसर्गाच्या सुयोग्य रोग निवारणाच्या पद्धती मध्ये ढवळाढवळ होऊ शकते. निसर्गाने निर्माण केलेली शरीरांतर्गत रोग निवारण पद्धती अभूतपूर्व आहे. अनेक रोग आपण घाईघाईने ढवळाढवळ न केल्यास चांगल्या तऱ्हेने बरे होऊ शकतात.
निसर्गाला थोडा वेळ द्या. त्याला त्याचे काम करून द्या. आपल्या घरात असणारी दैनंदिन वापरातील तुळस आले लिंबू लसुन हळद जिरे धने सुंठ मिरे ओवा तूप मध बडीशेप या मित्रांची मदत घ्या. त्यांच्यामध्ये अद्भुत आरोग्यदायी गुण भरलेले आहेत. ही नुसती पुराणातली वांगी नाहीत. साध्या ताज्या स्वच्छ अन्न आणि भाजीपाल्यात अनेक जीवनसत्वे आणि आवश्यक पोषक पदार्थ असतात. त्यांच्याकडे नाक मुरडून बघू नका. सध्याच्या शास्त्रीय प्रगतीमुळे यातील जीवनदायी तत्त्वे आता लॅबोरेटरी मध्ये नवीन नवीन नावे घेऊन सिद्ध झालेली आहेत. खरे म्हणजे नैसर्गिक अन्नधान्य फळे भाज्या फुले यामध्ये पहिल्यापासून असणारी जीवनसत्वे यांना आपण लॅबोरेटरी मध्ये संशोधन करून नवीन नवीन पाश्चिमात्य नावे दिल्यामुळे त्यांचा भाव जास्त वाढला आहे. त्यामुळे आपल्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी आलेली आहे. अनेक शतके चालू असणारी भारतीय अन्नपद्धती किती योग्य शास्त्रीय आधारावर अवलंबून होती याचा उलगडा आता आता होत आहे. याबद्दल सर्व शास्त्रीय संशोधन आणि पुरावे याचा खुलासा आपण पुढील भागात करू. तोपर्यंत अन्न हे पूर्णब्रह्म या वचनाप्रमाणे अन्नाचा आदर करून आणि प्रत्येक जेवणापूर्वी ईश्वराचे आभार बांधून अन्नग्रहण करा. प्रत्येक धर्मात अन्नग्रहण करण्यापूर्वी कृतज्ञतापूर्वक निसर्गाची देवाची प्रार्थना करून अन्नग्रहण करण्याची जुनी पद्धत विसरू नका.
आपल्या महाराष्ट्रात “ वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे,
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म.”
जय जय रघुवीर समर्थ
या वचनाची आठवण ठेवा आणि मुलांना शिकवा.

डॉ. अरविंद कुलकर्णी
संचालक, ऑन्कोलॉजी
इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टर
वाघोली, पुणे

14/08/2026

Integrated Medicine.
My personal views:
The present methods of scientific pharmaceutical research is geared for finding The Active Molecule. But any active molecule can not function in isolation without the support of the team bestowed by The Nature.
Most of modern medical practitioners are reluctant to look into other time tested systems of medicine. If particular system doesn't fit in their model of scientific research, they are not ready to acknowledge it. Anyway, proof of the pudding is in eating.! Dry arguments based mostly on lab findings don't mean much without actual grassroot user experience. Patients want to get better, no matter who treats and what system they follow. Truth can manifest in different ways.

Dr Arvind Kulkarni

08/08/2026

धागा धागा अखंड विणूया: भाग ३
अन्न आणि जीन्स क्रोमोसोम

जर्मन शास्त्रज्ञ डॉक्टर ऑटो वॉरबर्ग याने गेल्या शतकात अनेक महत्त्वाचे शोध लावले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऑक्सिजन आणि आरोग्य यांचा संबंध या विषयात. प्रयोगातून त्याने सिद्ध केले की ऑक्सिजनच्या शरीरातील कमतरतेमुळे कर्करोग कॅन्सर उद्भवू शकतो आणि वाढत जातो. त्याबद्दल त्याला दोनदा नोबेल प्राइस मिळवण्याचा मान मिळाला. शरीराच्या असंख्य पेशींचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ऊर्जा एनर्जी गरज असते. प्रत्येक पेशीत मायटोकाँड्रिया नावाचा सूक्ष्म भाग असतो . प्रत्येक पेशीत अनेक mitochondria असू शकतात. यांना ऊर्जा निर्माण करण्याच्या फॅक्टरीज म्हणावे लागेल. यामध्ये आपल्या अन्नातले सुक्ष्म कण आणि आपण श्वासातून मिळवलेला ऑक्सिजन याच्या ज्वलनाच्या साह्याने अडीनोसिन ट्राय फॉस्फेट ATP हे सूक्ष्म केमिकल तयार होते. पेशींच्या अंतर्गत याचा स्फोट करून लागेल तशी एनर्जी मिळू शकते. यावर सगळी पुढची मेटाबोलिक म्हणजे अंतर्गत कारभाराची पद्धत अवलंबून असते. यासाठी मुख्यतः अन्नातील ग्लुकोजचे अणू आणि ग्लुटमिन या प्रथिन अणूंचा उपयोग केला जातो. शरीरात असणाऱ्या इन्सुलिन या हार्मोन्सचा उपयोग हे कार्य करण्यासठी होत असतो. ग्लुकोज साखरेचे प्रमाण इन्सुलिनमुळे आटोक्यात राहते. शरीरातील साखर वाढल्यास हे इन्सुलिन पुरेसे काम करू शकत नाही आणि त्यामुळे डायबिटीस सारखे रोग निर्माण होतात. याला इन्सुलिन रेजिस्टन्स असे म्हणतात. हे आपल्याला रक्त तपासणीवरून कळू शकते. ऑक्सीजन चा पुरवठा कमी पडल्यास या साखरेचे रूपांतर लॅक्टिक ऍसिड नावाच्या शरीरात गरज नसलेल्या आणि धोकादायक द्रव्यामध्ये होते. याचा उपयोग चांगल्या पेशींना न होता कॅन्सरच्या पेशी यावर वाढतात. यातून निर्माण झालेले विषारी कण यांना ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल असे म्हटले जाते. हे निरुपयोग असून घातक ठरू शकतात. यांचा निचरा करायला शरीराची संरक्षण व्यवस्था सज्ज असते परंतु एका मर्यादेबाहेर यांचा प्रादुर्भाव झाल्यास शरीराची संरक्षण यंत्रणा पुरी पडत नाही. यामुळे इतर पेशींच्यावर आणि जीन्स वर घातक परिणाम होऊ शकतात आणि त्याला mutation असे म्हणतात. शरीरातील असंख्य 40 ट्रिलियन पेशी मध्ये ही mutations हजारोंच्या संख्येने रोजच होत असतात. शरीर यंत्रणा त्याचा योग्य बंदोबस्त कायम करते. परंतु प्रमाणाबाहेर mutations झाली तर त्यांचा नाश करणे आपल्या संरक्षण यंत्रणेला शक्य होत नाही. या दुष्परिणामामुळे अनेक रोग निर्माण होऊ शकतात त्यातील कॅन्सर हा एक प्रमुख रोग आहे. चुकीच्या आणि घातक अन्नामुळे मेटाबोलिजन बिघडतो आणि त्यातून रोगाची निर्मिती होते. यावर कंट्रोल करणे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात आहे.

आतापर्यंतच्या कॅन्सर संशोधनात मुख्य भर कर्करोग पेशींचा विनाश करणे याच्यावरच आहे. परंतु कर्करोग निर्माण करणारा अन्नाचा मेटाबोलिजम याकडे पुरेसे लक्ष दिले नाही. कॅन्सर हा मेटॅबोलिक डिसीज आहे. जीन्स मधील बदल त्यामुळे नंतर होतात यावर संशोधन सुरू आहे. कॅन्सर वरची नवनवीन औषधे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी लॅबोरेटरी मध्ये जातात. यात लाखो करोडो डॉलर्स रोज खर्च होतात. महागडी किमोथेरपीची औषधे पेटंट घेऊन निर्माण होतात. पण अशा औषधांमुळे कॅन्सरवर सबळ नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. जोपर्यंत आपण मूळ कारण नष्ट करत नाही तोपर्यंत फक्त कॅन्सर पेशींचा नाश केला तरी कॅन्सर परत उद्भवण्याची शक्यता असणारच. त्यासाठी आपल्या स्वतःला आपल्या आरोग्याची आहार विहार विचार आणि आचार याची काळजी घ्यायला लागेल. त्यासाठी पैशांच्या पेक्षा स्वतःच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी “ तूच आहेस तुझ्या आरोग्याचा शिल्पकार “ या वचनाचा अभ्यास आणि यावर कृती करावी लागेल.

या संबंधात आयुर्वेदाने फार सुंदर उहापोह केलेला आहे. चुकीच्या आहार पद्धतीमुळे आणि दूषित झाल्यामुळे शरीरात विषारी पदार्थांची निर्मिती होते याला आयुर्वेदात आम असे म्हणलेले आहे हे विषारी पदार्थ वेगवेगळ्या अवयवात साठत गेल्यास तेथे सूज निर्माण होते. त्याला आयुर्वेदात शोथ असे नाव आहे. यापासून विविध प्रकारचे रोग होतात. त्याचा बंदोबस्त वेळीच झाला नाही तर या सुजेचे रूपांतर क्रोनिक inflammation या रूपात होते. अनेक महिने किंवा वर्षे हे चालू राहिल्यास जीन्स मध्ये mutations होऊन कॅन्सरची निर्मिती होते.

आपले अन्न हे दुधारी शस्त्र आहे. खराब अन्नामुळे जीन्स खराब होऊ शकतात याउलट चांगल्या अन्नामुळे खराब झालेली जीन्स पण दुरुस्त होऊ शकतात !

अन्न म्हणजे नुसतेच प्रोटीन्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स आणि मिनरल्स यांचे निर्जीव मिश्रण म्हणता येणार नाही. अन्न भाजीपाला इत्यादी सर्व पदार्थात प्राणमय ऊर्जा असते. अनेक दशकांच्या पूर्वी भारताचे शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतीला पण जीव असतो ही गोष्ट प्रयोगात सिद्ध केली आहे. शेतकऱ्यांच्या चांगल्या विचारांच्या मुळे सुद्धा धान्याचे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते. संगीताचा आणि शब्दांच्या उच्चारामुळे सुद्धा धान्य पिकाच्या प्रतीत फरक पडू शकतो.

त्याचप्रमाणे घरी स्वयंपाक करताना , स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मनस्थितीचा परिणाम तयार झालेल्या अन्नावर होतो. असे अन्न खाणाऱ्या आणि वाढणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेचा परिणाम शरीराच्या आरोग्यावर होतो. म्हणूनच आईच्या हातचा घरगुती स्वयंपाक मुलांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अन्नाची महती केवळ कॅलरीज मध्ये मोजता येणार नाही. अन्न हे पूर्णब्रह्म !

पुढच्या भागात यासंबंधी आपण सखोल विचार करू.

डॉ. अरविंद कुलकर्णी
संचालक, ऑन्कोलॉजी
इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टर
वाघोली, पुणे

04/08/2026

माझा मनोपदेश,
माझ्या मनात दडलेल्या मनोरुग्णासाठी😔

प्रिय मित्र मनोज कुमार,

तुझ्या तब्येतीची काळजी आपल्या सर्वांना घ्यायला पाहिजे. तुला त्रास होतो ते बघून वाईट वाटतं. खालील काही विचार मनात आहेत. हे तुला उपदेशाकरता नाही. तुझ्या चुका दाखवण्याकरता नाही.
तुला रागवण्याकरता पण नाही.
तुला काही काही गोष्टींचा राग येणे स्वाभाविकच आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो
प्रत्येकाच्या रिएक्शन वेगळ्या होतात. परंतु त्या रिएक्शन चा आपल्या स्वतःला त्रास होऊ नये म्हणून आपण विचार केला पाहिजे. त्वरित रिएक्शन करण्याअगोदर दुसऱ्याच्या ॲक्शनचा आणि परिस्थितीचा विचार शांतपणे करायला पाहिजे. आपल्या रागामुळे लोक घाबरतात आणि सुधारणा पण होत नाही. आपल्या रागाचा परिणाम लोकांच्या पेक्षा प्रथम आपल्यावरच होतो आणि आपली तब्येत बिघडते. आपण मनातून खचत जातो. आपण स्वतःलाच रोगाला आमंत्रण करण्यासारखे झाले. पण आपण त्याचा दोष दुसऱ्यावर फोडतो. लोकांचे पण अनेक चुकते. सर्वच लोक बरोबर वागत नाहीत. आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. त्यांच्या मनात सुद्धा चांगल्या भावना नसतात. पण त्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. राग करून काही उपयोग नाही. आपण देवावर विश्वास ठेवतो . देव आपले भले करो म्हणून सारखे प्रार्थना करतो. देवळाबाहेर दर्शनासाठी हातात नारळ फुले घेऊन मोठ्या रांगा लावतो. पण देव म्हणजे आपले साधे सरकार नाही. वेळ म्हणजे सरकारांचे पण सरकार आहे. त्या देवाने सगळे हे जग आणि विश्व निर्माण केले आहेत. सगळ्या माणसांचा विशेष वेगवेगळा स्वभाव पण त्याने घडवला आहे. हे सर्व नाटक देव बाहेरून बघत आहे हा विश्वास पाहिजे. त्या नाटकात आपण आपलाही रोल बरोबर बजावला पाहिजे. मनातून खरोखर फारदुःख किंवा फार आनंद होता कामा नये. आणि सहकार्यांबद्दल आढी ठेवून उपयोग नाही. सर्व टीव्ही मराठी सिरीयल मध्ये नायक नायिका आणि खलनायक आणि जास्त प्रमाणात खलनायिका असतात.😀 आपल्याला खलनायकांचा राग येतो, पण तो राग फक्त टीव्ही बघताना असतो. सिरीयल बघितल्यानंतर आपल्याला वाटतं किती छान सर्वांनी एक्टिंग केले आहे. खलनायकाने चांगले ऍक्टिंग केले नाही तर त्याचा प्रभाव पडणार नाही. समाजात वागताना लोकांच्या बद्दल मनात आढी ठेवून वागू नये. सोशल मॅनर्स मनातून आणि मनापासून सांभाळले पाहिजेत. बाहेरून तुम्ही काही सुधारणा करण्यासाठी बोला परंतु मनातून रागावता कामा नये. सर्वांवर आदर प्रेम असले पाहिजे . त्याचा अर्थ जाऊन लगेच गळ्यात पडावे असा होत नाही. किंवा स्तुती लगेच करण्याची गरज नाही. या सर्व भावना मनातच ठेवणे चांगले. काही न बोलता सुद्धा या भावना लोकांच्या पर्यंत पोहोचतात.
त्यासाठी समंजसपणे आणि शांतपणे ॲक्शन घ्यावी लागते. नुसत्या रिएक्शन चा उपयोग होत नाही. लोकांचे वागणे फक्त आपल्यावर केंद्रीत नसते. प्रत्येक माणूस स्वतःच्या मनाप्रमाणे स्वकेंद्र प्रमाणे वागतो. दुसरे त्यांच्या मनाप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे वागत असतात. प्रत्येकाचा उद्देश दुसऱ्याचा दोष दाखवून अपमान करण्याचा नसतो. तो त्याच्या स्वभावानुसार बोलतो आपण आपल्या स्वभावानुसार अर्थ काढतो आणि सुख किंवा दुःख मानतो. त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो, चांगला किंवा वाईट. आपली स्थिती लंबकासारखी असते. वाटले तर कधी फार स्तुती आणि नाहीतर निंदा आणि दोषदृष्टी. आपल्या स्वभावाचा विचार आपणच करून त्यातून समाधानाचा मार्ग शोधला पाहिजे. सुख बाहेरील पदार्थावर असते समाधान मात्र आतच असते.

पोटात काहीही नसताना सतत देशी विदेशी औषधांचा मारा केल्यास पोट खवळून उठते आणि मग त्याचे रूपांतर ऍसिडिटी डोकेदुखी पोटदुखी अंगदुखी इत्यादी आजारात निर्माण होते. हे आजार अंगात सतत मुरत गेल्यामुळे तर विविध प्रकारच्या दीर्घ आणि सिरीयस आजारांची निर्मिती घेऊ शकते.

प्रथम सात्विक आहार घेतला पाहिजे. थोडे खा पण चांगले खा वेळेवर खा. योग्य तो व्यायाम करा शांतपणे झोपायची सवय करा. मोबाईलचे गुलाम बनू नका.
सगळ्या आजारांची निर्मिती पोटापासून होते त्याची काळजी घेणे गरज आहे. प्रत्येक दुखण्याला गोळी नसते परंतु गोळीला मात्र गिऱ्हाईक लाभते.😉 त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी जगाच्या बाजारात खरेदी डोळसपणे योग्य तऱ्हेने केली पाहिजे .
योग्य आहार विहार आणि विचारांच्या मुळे पुष्कळ आजार बरे होतात. सांगणे सोपे पण करणे कठीण😉
हे माझे मनोगत माझ्यासाठी आहे. 😀

बरे आहे मित्रा. सतत भेटत राहू. काही लागल्यास मला केव्हाही हाक मार. मी तुझ्या बरोबरच असतो.
🙏

अरविंद कुलकर्णी.

03/08/2026

धागा धागा अखंड विणूया: भाग 2
संरक्षण यंत्रणा आणि रोग प्रतिबंधक शक्ती

जे पिंडी तेच ब्रह्मांडी. मानवी शरीर आणि एखाद्या देशाची तुलना येथे करता येईल

एखाद्या देशात अनेक विविध प्रकारचे लोक राहतात पण त्या सर्वांनी एकजुटीने काम केल्यास देशाची प्रगती होऊ शकते आणि प्रत्येक माणसाचा पण विकास होऊ शकतो. त्याचप्रमाणे शरीरात अनेक अवयव tissue आणि कामगार पेशी एकत्रपणे शरीराच्या भल्या करता आणि स्वास्थ्यासाठी काम करत असतात. केंद्रीय शासन जर व्यवस्थित असेल तर सर्व विविध यंत्रणा व्यवस्थित काम करतात. देशाशी जशी संरक्षण व्यवस्था असते त्याचप्रमाणे शरीराची पण अतिशय नियमानुसार चालणारी व्यवस्था असते त्याप्रमाणे सर्व कार्य चालू असते. मेटाबोलिसम चयापचया द्वारा सर्व अन्नघटकांचा आणि साधनांचा पुरवठा आणि काम झाल्यानंतर होणाऱ्या टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावायची निसर्गाने अत्यंत चोख व्यवस्था केली आहे. देशाला जसा बाहेरील आणि अंतर्गत शत्रूंचा धोका असतो व त्याचा मुकाबला करण्यासाठी जशी संरक्षण व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था असते त्याचप्रमाणे अत्यंत गुंतागुंतीची आश्चर्यकारक संरक्षण आणि रोगप्रतिबंधक व्यवस्था निसर्गाने प्रत्येक जीवाच्या शरीरात निर्माण केलेली आहे. आपण त्याची स्वतःहून योग्य ती आजीवन काळजी घेणे जरूर आहे . हे एक मोठे immunology शास्त्र आहे

या संरक्षण आणि प्रतिबंधक व्यवस्थेचे आपल्या शरीरात 24 तास काम चालू असते. त्यातले प्रमुख धुरंधर कामगार म्हणून खालील पेशींचा आणि कार्यपद्धतींचा समावेश होतो. आपल्या शरीरात श्वेत रक्तपेशी अनेक वेगवेगळ्या रूपाने हे काम करतात. बाहेरून जंतू किंवा एखादा विषारी पदार्थ शरीरात येऊ लागला तर या धुरंधर पेशी शत्रूला शोधून काढून त्याला अटक करून त्याचा त्वरित नाश करतात. त्याचप्रमाणे काही अंतर्गत शत्रूंनी जनसामान्य पेशींमध्ये विद्रोह mutation घडवून उठाव केल्यास त्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी ही यंत्रणा तत्पर असते. या कार्यामध्ये धुरंदर म्हणून natural killer cells, macrophages,Phagicytes, basophil, T cell, B cell, mast cell, dendrite cell इत्यादी प्रमुख घटकांचा उल्लेख करावा लागेल. जसे पोलिसांच्या किंवा संरक्षण विभागाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्यास परकीय किंवा अंतर्गत हल्ला देशावर होऊ शकतो त्याचप्रमाणे या शारीरिक धुरंदरांच्या मध्ये बिघाड झाल्यास अनेक रोग उद्भवू शकतात. तेव्हा या सिस्टीमची योग्य ती काळजी घेणे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. या प्रणालीची काळजी मुख्यता न्यूट्रिशन म्हणजे अन्नधान्यातून घेतली जाते. अन्नधान्य चांगले आणि जरुरीप्रमाणे दिल्यास ही सिस्टीम ही प्रणाली चांगले काम करते म्हणूनच अन्न हे पूर्णब्रह्म हे वाक्य फार महत्त्वाचे आहे. जुन्या पेशींचा नाश केला जातो आणि त्यापासून निर्माण होणारा कचरा शरीराबाहेर टाकला जातो . त्याच बरोबर ताबडतोब नवीन कामगार पेशींची जरुरीप्रमाणे निर्मिती आणि स्थापना केली जाते. या नैसर्गिक रहाटगाड्यांनुसार चालणाऱ्या कार्यात बिघाड genetic mutation झालेल्या पेशी केंद्रीय सत्ता न जुमानता आपल्या मनाप्रमाणे स्वैर वागणूक सुरू करतात आणि वाढत जाऊन त्यापासून कॅन्सरची निर्मिती होऊ शकते. अनेक कारणामुळे आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अंतर्गत सूज बरेच दिवस वास्तव्य करते त्यामुळे जेनेटिक म्युटेशन्स होऊन विघातक पेशी निर्माण होतात. कॅन्सरला खत पाणी घालणारे पेशींचा वेळेस बीमोड झाला नाही तरच कॅन्सर वाढतो.

त्यामुळे या सूक्ष्म शारीरिक कार्याची योग्य तऱ्हेने काळजी घेणे आपल्याला नैसर्गिक संरक्षण इम्युनिटी मुळे करणे गरजेचे असते. याकडे दुर्लक्ष झाल्यास कॅन्सर फैलावतो होतो आणि पसरतो.

आपली शरीरांतर्गत संरक्षण व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था योग्य तऱ्हेने काम कसे करेल, त्याकरता काय केले पाहिजे याबद्दल आपण पुढील भागात जास्त सविस्तर माहिती घेऊ.

डॉ. अरविंद कुलकर्णी
संचालक, ऑन्कोलॉजी
इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेन्टर
वाघोली, पुणे

डॉ. सदानंद सरदेशमुख यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी.लिट. पदवी प्रदानआयुर्वेद, कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण क्षेत्...
30/07/2026

डॉ. सदानंद सरदेशमुख यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी.लिट. पदवी प्रदान

आयुर्वेद, कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील ५८ वर्षांच्या समर्पित कार्याचा गौरव

नाशिक, २८ जुलै २०२६ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) यांच्या २५ व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष आणि BSDT’s Integrated Cancer Treatment and Research Centre, वाघोली, पुणेचे संचालक प्रोफेसर एमेरिटस डॉ. सदानंद प्रभाकर सरदेशमुख यांना आयुर्वेद, कर्करोगावरील समन्वयात्मक उपचार, संशोधन, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय आणि दीर्घकालीन योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Litt.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

ही प्रतिष्ठेची मानद पदवी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते डॉ. सरदेशमुख यांना प्रदान करण्यात आली.

या गौरवशाली समारंभास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. नरहरी झिरवाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी डॉ. अनंत पांढरे यांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्यासह विद्यापीठाचे मान्यवर अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी गेल्या ५८ वर्षांपासून आयुर्वेद, कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण व समर्पित कार्य केले आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समन्वय साधत त्यांनी कर्करोगाच्या समन्वयात्मक उपचारपद्धतीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यातून आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांच्यातील समन्वयाला एक नवी दिशा मिळाली आहे.

त्यांच्या संशोधनकार्याची दखल अमेरिकेतील (US) ५ पेटंट्स तसेच भारतातील ५ पेटंट्सना मिळालेल्या मान्यतेच्या माध्यमातूनही घेण्यात आली आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान, औषधोपचार आणि संशोधन यांना आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत त्यांनी केलेल्या कार्याचे हे महत्त्वपूर्ण द्योतक आहे.

डॉ. सदानंद सरदेशमुख हे नाडी परीक्षणाच्या परंपरेतील 10 व्या पिढीचे वारसदार असून, या प्राचीन आणि पारंपरिक ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत हस्तांतरण करण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या नाडी परीक्षणाच्या ज्ञानाचा त्यांनी आधुनिक वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास आणि उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.

आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान, नाडी परीक्षणाची समृद्ध परंपरा, कर्करोगावरील समन्वयात्मक उपचार, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण या विविध क्षेत्रांना एकत्रितपणे पुढे नेण्याचे डॉ. सरदेशमुख यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा, संशोधन आणि समाजोपयोगी कार्याला वाहून घेतलेले त्यांचे जीवनकार्य अनेक विद्यार्थी, वैद्य, संशोधक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

त्यांच्या ५८ वर्षांच्या प्रदीर्घ आणि समर्पित संशोधन व सेवाकार्याची, आयुर्वेदाच्या संवर्धनातील योगदानाची तसेच कर्करोग उपचार आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान केली. हा सन्मान केवळ डॉ. सदानंद सरदेशमुख यांचा वैयक्तिक गौरव नसून आयुर्वेद, भारतीय पारंपरिक ज्ञानपरंपरा आणि समन्वयात्मक कर्करोग उपचार क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण आहे.

या गौरवास्पद सन्मानाबद्दल डॉ. सदानंद सरदेशमुख यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.










*Dr. Sadanand Sardeshmukh conferred Honorary Doctor of Literature (D.Litt.) Degree by the Hon'ble Governor of Maharashtr...
30/07/2026

*Dr. Sadanand Sardeshmukh conferred Honorary Doctor of Literature (D.Litt.) Degree by the Hon'ble Governor of Maharashtra*

Recognition for 58 years of dedicated service in Ayurveda, Integrative Cancer Care, Research, and Medical Education

On the occasion of the 25th Convocation Ceremony of the Maharashtra University of Health Sciences (MUHS), Nashik, Professor Emeritus Dr. Sadanand Prabhakar Sardeshmukh, Chairman of the Bharatiya Sanskriti Darshan Trust (BSDT) and Director of BSDT’s Integrated Cancer Treatment and Research Centre, Wagholi, Pune, was conferred the prestigious Honorary Doctor of Literature (D.Litt.) degree in recognition of his outstanding and lifelong contributions to Ayurveda, Integrative Cancer Care, Research, Medical Education, and Community Service.

The honorary degree was presented by the Hon'ble Governor of Maharashtra and Chancellor of the Maharashtra University of Health Sciences, Shri Jishnu Dev Varma in recognition to Dr. Sardeshmukh's exceptional achievements and distinguished service to the healthcare sector.

The prestigious convocation ceremony was graced by Hon. Shri Narhari Zirwal, Minister for Food and Drug Administration, Government of Maharashtra, as the Chief Guest. Dr. Anant Pandhare was also present as a distinguished guest. The event was attended by Prof. Dr. Sanjeev Sonawane, Vice-Chancellor of MUHS, along with senior university officials, faculty members, students, and eminent dignitaries from various fields.

For the past 58 years, Dr. Sadanand Sardeshmukh has devoted himself to the advancement of Ayurveda, cancer treatment, research, and medical education. By successfully integrating the timeless principles of Ayurveda with modern scientific approaches, he has made significant contributions to the development of integrative cancer care, creating a meaningful bridge between traditional Ayurvedic wisdom and contemporary medical science. His work has provided a new direction for collaboration between Ayurveda and modern medicine.

His pioneering research has also received international recognition through the grant of five patents in the United States and five patents in India. These patents reflect his sustained efforts to combine traditional Ayurvedic knowledge, therapeutic practices, and scientific research with modern evidence-based methodologies.

Dr. Sardeshmukh is the 10th-generation custodian of the ancient tradition of Nadi Pariksha (Pulse Diagnosis). He has dedicated himself to preserving, promoting, and passing on this invaluable heritage to future generations. Building upon his family's centuries-old lineage of pulse diagnosis, he has endeavoured to study and validate this traditional knowledge through modern scientific and medical research methodologies.

His work in advancing Ayurvedic knowledge, the rich tradition of Nadi Pariksha, integrative cancer treatment, research, and medical education has been are truly remarkable. His lifelong dedication to patient care, scientific research, and community service through Ayurveda has inspired generations of students, physicians, researchers, and healthcare professionals.

In recognition of his 58 years of distinguished service, pioneering research, remarkable contributions to the promotion of Ayurveda and exceptional work in integrative cancer treatment and research, the Maharashtra University of Health Sciences conferred upon him the Honorary Doctor of Literature (D.Litt.) degree. This honour is not only a personal milestone for Dr. Sadanand Sardeshmukh but also a proud moment for Ayurveda, India's rich traditional knowledge systems and the field of integrative cancer care.

Dr. Sadanand Sardeshmukh has been receiving widespread appreciation and congratulations from all sections of society for this prestigious honor. People have also extended their best wishes for his continued success and future endeavors.










Address

Bharatiya Sanskriti Darshant Trust's Integrated Cancer Treatment And Research Centre, Kesnand Road, Wagholi
Pune
412207

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919545508890

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurved for Cancer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurved for Cancer:

Shortcuts

Share