27/11/2018
“अब नॉर्मल होम”चा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
ह्या वर्षी दिवाळीनंतरच्या उपक्रमात अब नॉर्मल होमने किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्याचा विचार केला ज्यामध्ये रायगड, राजगड, पन्हाळा, सिंहगड आणि जंजिरा अशापाच किल्ल्यांच्या प्रतीकृती विशेष मुलांच्या सहभागाने तयारकरण्यात आल्या.
“ विशेष मुलांनाभाषिककौशल्यं आणि व्यवहारज्ञान ह्या गोष्टी तर आयुष्य चांगले जगण्यासाठी शिकवाव्याच लागतात परंतु आपण महाराष्ट्रात राहतो, पुण्यात राहतो तर त्याची जाणीव व्हावी तसेच त्याचा इतिहास कळावा हयासाठी खरं तर हा उपक्रम राबवावा असे वाटले. मग इतिहास आणि महाराष्ट्र म्हटल्यावर शिवाजी महाराजांपासून सुरुवात करावी असं वाटलं म्हणून मग दिवाळीच्या उपक्रमाच्या निमित्त्याने किल्ल्यांचे प्रदर्शन भरविले.”
ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांच्या समोर इतिहास साकारू लागला तेव्हा त्यांचे कुतूहल, वेगवेगळे प्रश्न, आनंद, समाधान. मजा असे अनेक पैलू समोर येऊ लागले आणि मग रोज गडांवरील चर्चा, बुरुज का असतात?, तटबंदी म्हणजे काय?, समुद्रात कसा किल्ला बांधला असेल? इत्यादी अनेक चर्चा सुरु झाल्या आणि जाणवले कि विशेष मुलदेखील ह्याविषयामध्ये रस घेऊन नवीन माहिती जाणून घेण्याची तयारी दाखवतय तर आपण ती माहिती त्यांना सोप्या भाषेत करून सांगितली पाहिजे.”
प्रदर्शनाच्या दिवशी मुलांनी खूपच छान पद्धतीने इतिहास मांडला. त्याचं खूप कौतुक.