Doctorbhagyashri -कदमडॉक्टर

Doctorbhagyashri -कदमडॉक्टर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Doctorbhagyashri -कदमडॉक्टर, Doctor, Vidyanagar, Pune.

डॉक्टर | ज्योतिषतज्ज्ञ | न्यूमरॉलॉजिस्ट | वास्तू सल्लागार
उपाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, येरवडा फुलेनगर मंडल
"महिला सक्षमीकरण, सामाजिक सेवा आणि जनकल्याणासाठी समर्पित.मागील 12+ वर्षांपासून आरोग्य, ज्योतिष, अंकशास्त्र आणि वास्तू क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे Name: Dr. Bhagyashri Kadam

Profession:
Doctor | Astrologer | Numerologist | Vastu Consultant

Details About Me:

मागील 12+ वर्षांपासून आरोग्य,

ज्योतिष, अंकशास्त्र आणि वास्तू क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे. समाजहित, महिला सक्षमीकरण आणि जनसेवा यासाठी सातत्याने कार्यरत. सध्या उपाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी, येरवडा फुलेनगर मंडल, पुणे

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकीचा सुंदर उत्सव म्हणजे रक्षाबंधन. राखीच्या या पवित्र धाग्यात क...
28/08/2026

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकीचा सुंदर उत्सव म्हणजे रक्षाबंधन. राखीच्या या पवित्र धाग्यात केवळ बंधन नसते, तर आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे, सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचे आणि नात्याची जपणूक करण्याचे वचन सामावलेले असते.

बालपणीच्या गोड आठवणींपासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भाऊ-बहिणीचे नाते कायम मनाला आधार देत राहते. काळ बदलला, अंतर वाढले तरी या नात्यातील प्रेम आणि आपुलकी कधीच कमी होत नाही. रक्षाबंधनाचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो.

या मंगलमय पर्वानिमित्त सर्व बंधू-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक दृढ होवो आणि त्यांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, यश व आनंद सदैव नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏❤️

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪢🌸

एक धागा… एक विश्वास… एक हक्काचा भाऊ!जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने 'सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे 'चे आयोजन करण्यात आले...
27/08/2026

एक धागा… एक विश्वास… एक हक्काचा भाऊ!

जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने 'सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे 'चे आयोजन करण्यात आले आहे. वडगावशेरी मतदारसंघातील सर्व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावासोबत रक्षाबंधनाचा हा प्रेमाचा आणि आपुलकीचा सण साजरा करूया. डॉ .भाग्यश्री कदम उपाध्यक्ष, बीजेपी महिला आघाडी , प्रभाग २
वेळ : रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता
📍 स्थळ : साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे हॉल, गुंजन थिएटर शेजारी, येरवडा, पुणे-०६

शासन आपल्या दारी  समस्या तुमची, जबाबदारी आमची!नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हावा,...
17/08/2026

शासन आपल्या दारी समस्या तुमची, जबाबदारी आमची!

नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हावा, यासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, 17 ऑगस्ट 2026

स्थळ: लुंबिनी उद्यान चौक, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी बोर्ड, येरवडा, पुणे-06
वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 01:00

स्थळ: कन्या हॉटेल शेजारी, एकता नगर, एअरपोर्ट रोड, विद्यानगर, पुणे
वेळ: संध्याकाळी 04:00 ते 07:00

मंगळवार, 18 ऑगस्ट 2026

स्थळ: प्रतिकनगर चौक, मोहनवाडी, येरवडा, पुणे-06
वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 01:00

विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

समस्या तुमची… जबाबदारी आमची!

#शासनआपल्यादारी #जनसेवा

वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा अभियान – ९ जुलै 2026दिनांक ९ जुलै रोजी "आषाढी वारीच्या " निमित्ताने वारकऱ्यांच्या आरोग्...
10/07/2026

वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा अभियान – ९ जुलै 2026

दिनांक ९ जुलै रोजी "आषाढी वारीच्या " निमित्ताने वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिरात अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
# तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
# आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून रुग्णवाहिकेची (ॲम्ब्युलन्स) सुविधा संपूर्ण वेळ सज्ज ठेवण्यात आली होती, जेणेकरून गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होऊ शकेल. आणि खरच एका वारकरी भगिनीचे प्राण वाचू शकले.

# प्रथमोपचार,
# रक्तदाब तपासणी
# आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि इतर अत्यावश्यक आरोग्य सुविधा वारकऱ्यांना विनामूल्य देण्यात आल्या.
मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आणि या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक भाविकांना वेळेवर उपचार व औषधोपचार मिळाले.
भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी आरोग्य उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
"वारी सेवा अभियान २०२६ "
*भाजपा वैद्यकीय आघाडी, वडगावशेरी
आणि
प्रभाग क्र. २, भाजपा फुलेनगर-येरवडा मंडळ*
यांच्या संयुक्त विद्यमाने

डॉ. योगेश कदम
(अध्यक्ष , भाजपा वैद्यकीय आघाडी, वडगावशेरी)
डॉ. भाग्यश्री कदम
सौ.रेश्मा गिरमे

09/07/2026

📰 वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका सेवा व खाऊ वाटपाचा स्तुत्य उपक्रम
आषाढी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकरी भक्तांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०२ व भाजपा वैद्यकीय आघाडी यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका सेवा तसेच खाऊ वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला.
या सेवा केंद्रात अनुभवी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांची रक्तदाब, शुगर व इतर प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. सेवा सुरू असताना एका वारकरी भक्ताची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ मोफत रुग्णवाहिकेद्वारे राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे पुढील उपचार त्वरित सुरू करता आले.
याशिवाय वारकरी भक्तांना मोफत खाऊ व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला वारकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, उपस्थितांनी आयोजकांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
यावेळी मा. मंगेश दादा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. डॉ. योगेश कदम, राहुल जाधव, राजकुमार बाफना, सुधीर वाघमोडे, सुभाष चव्हाण ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेवराव घाडगे, संदीप गोडसे, अभिजीत कदम, व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०२ तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांनी सेवाकार्यात मोलाचे योगदान दिले.

"वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा" या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला. 🙏🚩

📰 वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका सेवा व खाऊ वाटपाचा स्तुत्य उपक्रमआषाढी वारी निमित्त महाराष्ट्रा...

🙏 वारी सेवा अभियान २०२६ 🙏*भाजपा वैद्यकीय आघाडी, वडगावशेरीआणिप्रभाग क्र. २, भाजपा फुलेनगर-येरवडा मंडळ*यांच्या संयुक्त विद...
06/07/2026

🙏 वारी सेवा अभियान २०२६ 🙏
*भाजपा वैद्यकीय आघाडी, वडगावशेरी
आणि
प्रभाग क्र. २, भाजपा फुलेनगर-येरवडा मंडळ*
यांच्या संयुक्त विद्यमाने
पंढरपूर वारीतील वारकरी बांधवांच्या सेवेसाठी "वारी सेवा अभियान २०२६" आयोजित करण्यात आले आहे.
📅 दिनांक: *९ जुलै २०२६ (गुरुवार)*
🕗 वेळ: *सकाळी ८:०० ते दुपारी १:००*
📍 स्थळ: *राजू शेट मिसळ, विश्रांतवाडी, पुणे*
वारकरी बांधवांच्या सेवेसाठी आयोजित या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन सेवा आणि समर्पणाची परंपरा अधिक बळकट करूया.
आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
शुभेच्छुक
डॉ. योगेश कदम
President, भाजपा वैद्यकीय आघाडी, वडगावशेरी

माऊली च्या भेटीची आस..🙏🙏🙏
06/07/2026

माऊली च्या भेटीची आस..🙏🙏🙏

Address

Vidyanagar
Pune
411032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Doctorbhagyashri -कदमडॉक्टर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category