Dr. Nitin Londhe

Dr. Nitin Londhe "Om Yoga" gives the knowledge of "yog" and how to practice it in day to day life healthy Dr. Nitin Londhe Yoga.

Like & subscribe my youtube channel regarding healthy moves by ।।OM YOGA।।. https://youtube.com/channel/UC19pVaaa25VWd5UVTZTFyng

आजचा दिवस खास आहे.आपल्या दोघांच्या आयुष्यातील हा दिवस महत्त्वाचा आहे. दोन मने जुळली अन् दोन कुटुंबं एकत्र आली.ध्येय सापड...
19/05/2026

आजचा दिवस खास आहे.
आपल्या दोघांच्या आयुष्यातील हा दिवस महत्त्वाचा आहे.
दोन मने जुळली अन् दोन कुटुंबं एकत्र आली.
ध्येय सापडलं, आयुष्याला अर्थ आला.
वळण लागलं, गती आली.
संसार आणि मुलं सांभाळत स्वतःच्या करिअरला आकार दिला.
कुरबुर-नोकझोक, रुसवा-फुगवा याबरोबरच; स्थैर्या, आनंद, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, मान-सन्मान आणि मन:शांतीही सापडली.
त्याचं महत्त्वही कळलं.
लग्नाच्या आजच्या वाढदिवसाच्या हृदयापासून शुभेच्छा वैशू.. 🥰
- नि ३.

06/05/2026

Relax afternoon,
in busy schedule...

या चार  #बेसिक_tests गरजेच्या. हे रक्तातील एक amino acid आहे. त्याची पातळी 5 - 15 दरम्यान असते. त्यापेक्षा अधिक झाल्यास ...
01/05/2026

या चार #बेसिक_tests गरजेच्या. हे रक्तातील एक amino acid आहे. त्याची पातळी 5 - 15 दरम्यान असते. त्यापेक्षा अधिक झाल्यास रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांच्या भिंतींना ईजा होते.

ferritin. रक्तातील ferritin प्रोटीन पातळी हे HB पेक्षाही लवकर अंगातील रक्त कमी झाल्याचे दाखवते. 400 पेक्षा अधिक असेल तर ते inflammation markar सूज, infection दाखविणारे असते.

insuline 8 ते 12 तास विना अन्नपाणी रक्ततपासणी असते. नॉर्मल 5 ते 25 असते.पण 10 पेक्षा जास्त नको. 12 पेक्षा जास्त असेल तर prediabetic आणि 20 पेक्षा जास्त diebetic असते.

reactive protein लिव्हर मधून स्त्रवणारे Protein. Active inflammation, infection, tissue injury दाखवते. 10 पेक्षा जास्त असेल तर ते धोक्याचे समजावे.

Cardiovascular, neurological, metabolic health अशा महत्त्वाच्या गोष्टी चांगल्या ठेवायच्या असतील तर 30 पेक्षा जास्त वयाच्या लोकांनी वर्षाला एकदा या तपासण्या करणे खूप खूप महत्त्वाचे आहे.

-डॉ. #नितिन_शिवराम_लोंढे
(जनशील हॉस्पीटल, नेहरूनगर)

महात्मा बसवेश्वर जयंती 🙏नेहरूनगर.
19/04/2026

महात्मा बसवेश्वर जयंती 🙏
नेहरूनगर.

@एक १९ वर्षाचा मुलगा अविचाराने घाणेरडे कृत्य करतो. @त्याच्या बोलण्याला, त्याच्या दिखाऊपणाला, भूलथापांना बळी पडून एक दोन ...
16/04/2026

@एक १९ वर्षाचा मुलगा अविचाराने घाणेरडे कृत्य करतो.
@त्याच्या बोलण्याला, त्याच्या दिखाऊपणाला, भूलथापांना बळी पडून एक दोन नव्हे तब्बल १८० मुली त्याच्याबरोबर जायला तयार होतात.
@त्याच्यासोबत कळत नकळत साडेतीनशे व्हिडिओज काढले जातात.
#दोन्हीकडची_मानसिकता...
काही प्रश्न
@आई-वडील, पालकांचे दुर्लक्ष, जाऊ दे, असाच आहे तो/ ती, होईल पुढे सरळ इ. इ. ?
@इतक्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या मुली स्वखुशीने, कुठल्या तरी आमिषाने, दबावाने, ब्लॅक मेलिंग इ. प्रकाराने तयार झाल्या असतील का?
@एवढ्या कमी वेळेत आणि एकाच एरिया वा शहरात एवढ्या मोठ्या संख्येने, नुकताच वयात आलेला एकच मुलगा हे प्रकार कसा करू शकतो?
@पूर्ण गँग होती का, शरीर विक्रीसाठी अशा मुलींचा सौदा होत होता का, जबरदस्तीने त्यांना या दलदलीत ढकलले जात होते का?
@१८० मधल्या केवळ सात मुलींचीच FIR झालीय म्हणे, मग इतर मुली तक्रार करायला बाहेर का पडत नाहीयेत?
#काही_मुद्दे
@तरुण वयात येताना होणारे हार्मोन्स मधील बदल, अती उत्साह, स्वतःची वेगळी ओळख येन केन प्रकारेण करण्याची जिद्द, नको त्या पैंजा लावून नको तिथे नको ते धाडस दाखवण्याची खुमखुमीला वेळेत आवर घालणं आवश्यक असते.
@आपला मुलगा किंवा मुलगी किती वाजता बाहेर पडतात, त्यांचे लाइव्ह लोकेशन काय असते,
@त्यांचे मित्र किंवा मैत्रिणी कुठल्या संस्कारात वाढलेल्या आहेत, त्यांचे विचार, राहणीमान आपल्या मुलाला किंवा मुलीला पुढे संकटात तर नाही टाकणार
@पदोपदी संशयी नजर आज वयात आलेल्या प्रत्येक मुलगा आणि मुलीच्या आईवडिलांची हवी.
स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली हा विचार कितीही बुरसटलेला तुम्हाला वाटत असला तरी आता ह्या घडीला ती काळाची गरजच आहे असे म्हणावेसे वाटते.

-डॉ. नितिन शिवराम लोंढे
Janshil hospital.
(Expert in life style modification preventive medicine diet and yog therapy)

 #दोन_पिढींच्या_मधले_अंतर.   या विषयावर मी नुकतेच आपल्या मासुळकर कॉलनी ज्येष्ठ नागरीक संघ मध्ये व्याख्यान दिले.माझ्या व्...
13/04/2026

#दोन_पिढींच्या_मधले_अंतर.
या विषयावर मी नुकतेच आपल्या मासुळकर कॉलनी ज्येष्ठ नागरीक संघ मध्ये व्याख्यान दिले.
माझ्या व्यवसायाला थोडंसं अंतर देत मी वेगळ्या विषयाला हाताळायचं धारिष्ट केलं. खरं तर माझी पिढी नशीबवान आहे; आम्ही झपाट्यानं सारे बदल होताना पाहिले. अगदी वातावरणापासून माणसांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचे सुद्धा आम्ही साक्षीदार राहिलो आणि राहतोय.
पिढ्यांची अंतरे काळदृष्ट्या कमी झालीय पण संवाद, दिसणं, असणं आणि स्पर्शाच्या दृष्टीने दुरावत चालली आहेत. या सगळ्यांचा उहापोह सूक्ष्म पातळीवर मांडण्याचा प्रयत्न मी केला. अतिशय धन्यवाद ज्येष्ठ नागरीक संघाची कार्यकारिणी अजी विशेषतः श्री लडकत साहेब यांचे.. 🙏

-डॉ. #नितिन_शिवराम_लोंढे.
(Expert in life style modification, preventive medicine, diet and yog therapy)
(जनशील हॉस्पीटल, नेहरूनगर, पिंपरी)

 #ग्रामदैवत  #भैरवनाथ_यात्रा 🙏
04/04/2026

#ग्रामदैवत
#भैरवनाथ_यात्रा 🙏

हनुमान जयंती उत्सव 🙏
02/04/2026

हनुमान जयंती उत्सव 🙏

26/03/2026

#रामनवमी..
या दिवशी साईंचा दरबार काही वेगळाच असतो.
ओम् साई राम.. 🙏

 #गुरुपद..    गुरुपदावर पोहोचून लोकांच्या भावनांशी अत्यंत हीन पद्धतीने खेळणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या चर्चा आहे. लोकांच्या...
20/03/2026

#गुरुपद..
गुरुपदावर पोहोचून लोकांच्या भावनांशी अत्यंत हीन पद्धतीने खेळणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या चर्चा आहे. लोकांच्या दुखऱ्या नसेवर बरोबर बोट ठेऊन त्यांना हळवं करायचं, वशीभूत करायचं; अन् एकदा का त्यांना पूर्ण विश्वासात घेतलं की त्यांचे पैसै, घरदार, वेळ, अब्रू सर्वकाही हळूहळू हिसकावून घ्यायचं.
असे बरेच स्वयंघोषित गुरू प्रत्येक दशकांमध्ये आपल्याला दिसून आलेत. आणि त्यांच्या विरोधात वेळोवेळी हिमतीनं चढविलेला आवाज त्यांना त्यांची खरी जागा दाखवूनही गेला आहे. अगदी त्या आवाजाचा साम,दाम,दंड,भेद इ. चा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला गेला तरीही.
#चूक_कोणाची?
जिथं अस्थिरता तिथं अंधश्रद्धा. प्रत्येकाच्याच मनात कसली ना कसली भीती, कसलीतरी आशा-लालसा, कमी वेळेत भरपूर, विनाकष्ट खूप काही मिळवण्याची इच्छा असते. मग काय? फायदा घेणारे, बोलण्यात पटाईत, देहबोली आणि शब्दांच्या जाळ्यात सर्वसामान्यांना वशीकरण करून ओढणारे टपूनच असतात. त्यातच मोठी मोठी राजकारणी माणसं, सेलिब्रिटी, उद्योगपती, कलाकार इ. चा राबता असेल तर विश्वास बसवायला वेळ लागत नाही.
ाय_करायचं?
डोकं ठिकाणावर ठेवायचं. श्रद्धा ठेवायची. ती ही तारतम्याने. खरं तर एखाद्याचं चारित्र्य शुद्ध असेल तर तो त्याच्या कर्मानेच इतरांसाठी आदर्श ठरतो. इतरांच्या गुरुस्थानी येतो. तो स्वतः कधीच म्हणत नाही किंवा तो स्वतःला कधी सिद्ध करायचा प्रयत्नही करत नाही. त्याच्या शुद्ध कर्मानेच देव सुद्धा त्याच्या सोबत असतो. त्याची आपल्या कामावरची निष्ठा, इतरांबद्दलची कणव, कायम निस्वार्थपणे लोकांना मदत करण्याची आपसूक आलेली तळमळ आणि कुठल्याही परिस्थितीत नेहमी न डगमगता आपल्या योग्य विचारांवर ठाम राहणं याच गोष्टी त्याला गुरूपदावर पोहोचवतात...
हरी ओम्...

इच्छामरण...   बातमी वाचली. देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षाहून अधिक काळ कोमामध्ये असलेल्या व्यक्तीला इच्छामरणा...
12/03/2026

इच्छामरण...
बातमी वाचली. देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षाहून अधिक काळ कोमामध्ये असलेल्या व्यक्तीला इच्छामरणाची परवानगी दिली.
खंडपीठाचे न्यायमूर्तींनी अगदी भावुकतेने हा निर्णय दिला.
यावेळी,
@कृत्रिम जीवरक्षक यंत्रणा काढून रुग्णाला निष्क्रिय इच्छामरण दिले जाते.
@रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेला जीवनरक्षक पुरवठा किंवा उपचार जाणूनबुजून काढून घेतला जातो.
मात्र,
@उपचार मागे घेणे हे मानवीय असले पाहिजे.
@त्यासाठी योग्य रचनेची आवश्यकता हवी.
@उपचाराचा अवाढव्य खर्च, वैद्यकीय मंडळांचे अहवाल, तज्ञ डॉक्टरांचे मत, बरे होण्याची शक्यता १०० टक्के नसणे इ. घटकांचा विचार व्हावा.
खरं तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाने त्याची निस्वार्थ पणे इतकी वर्षे काळजी घेतली. डॉक्टरांनी सुद्धा उपचाराचे कर्तव्य केले पण रुग्ण बरे होण्याची आशाच नसल्याने ते उपचार केवळ त्याचे निष्क्रिय जैविक आयुष्य वाढवत होते.
हा ऐतिहासिक निकाल येण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी घडल्या, चर्चा-विमर्श, एखाद्याचे जीवन हिसकावून घेणे म्हणजे खूनच, नैसर्गिकपणेच मृत्यू यावा अशी अपेक्षा वगैरे, वगैरे. मात्र सर्व गोष्टींचा विचार करता आयुष्यात प्रॅक्टिकल होणे गरजेचे असते. त्यानुसार जाणाऱ्यालाही यातनेतून मुक्त करणे गरजेचे असते. पण..
भीती वाटते की या केसच्या आधारे उद्या कायदा लागू केला गेलाच तर त्याचा दुरुपयोग सत्ता आणि पैशाच्या जोरावर नाहक बळी घ्यायला होऊ नये म्हणजे झालं.

-डॉ. नितिन शिवराम लोंढे
(जनशील हॉस्पीटल, नेहरूनगर, पिंपरी, पुणे)

Address

Janshil Hospital, Old Telco Road, Nehrunagar, Pimpri
Pune
411018

Telephone

+919423583111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Nitin Londhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Nitin Londhe:

Share

Category