Poona Geriatric Care Center - An Innovative Old Age Home

  • Home
  • India
  • Pune
  • Poona Geriatric Care Center - An Innovative Old Age Home

Poona Geriatric Care Center -  An Innovative Old Age Home Poona Geriatric Care Center is an out come of the collective thinking of the professional social workers, social work teachers, psychiatric consultants and

01/06/2026
पुना जेरियाट्रिक केअर सेंटरपूना जेरियाट्रिक केअर सेंटरमध्ये जेष्ठांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियोजनबद्ध ...
31/05/2026

पुना जेरियाट्रिक केअर सेंटर

पूना जेरियाट्रिक केअर सेंटरमध्ये जेष्ठांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियोजनबद्ध व व्यावसायिक पद्धतीने कार्य केले जाते. विशेषतः अल्झायमर आणि डिमेन्शिया यांसारख्या वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आजारांनी प्रभावित जेष्ठांसाठी विविध उपचारपद्धती, थेरपी आणि उपक्रम राबवले जातात.

जेष्ठांची बौद्धिक क्षमता, मानसिक आरोग्य आणि शारीरिक कार्यक्षमता टिकून राहावी यासाठी विविध प्रकारचे बौद्धिक, सामाजिक, शारीरिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. या उपक्रमांमुळे जेष्ठांचा उत्साह वाढतो, आत्मविश्वास टिकून राहतो आणि आजारांच्या लक्षणांमुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

जेष्ठांना सतत सकारात्मक आणि अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्यास त्यांचा दिवस आनंददायी, सक्रिय आणि समाधानकारक बनतो. याच उद्देशाने पूना जेरियाट्रिक केअर सेंटरमधील प्रशिक्षित व अनुभवी प्रोफेशनल स्टाफ अत्यंत समर्पितपणे कार्य करतो.

यामुळे सेंटरमधील जेष्ठ शांत, समाधानी, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण जीवन जगताना दिसून येतात. जेष्ठांच्या आयुष्याला अधिक अर्थपूर्ण, सन्माननीय आणि आनंदमय बनविणे हेच आमचे ध्येय आहे.

– पूना जेरियाट्रिक केअर सेंटर
जेष्ठांच्या सन्मानपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी समर्पित सेवा.

धन्यवाद. 🙏🏻

26/05/2026
24/05/2026

पूना जेरियाट्रिक केअर सेंटर ही जेष्ठांची काळजी घेणारी एक संवेदनशील संस्था असून, जेष्ठांचे उर्वरित आयुष्य आनंदी, अर्थपूर्ण आणि उत्साहपूर्ण व्हावे यासाठी सातत्याने कार्य करत आहे. जेष्ठांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास कमी करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न येथे केला जातो.
विविध उपक्रम, कार्यक्रम आणि थेरपीच्या माध्यमातून जेष्ठांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतांचा योग्य वापर करून त्या टिकवून ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. जेष्ठ सतत सक्रिय आणि कार्यरत राहिल्यामुळे त्यांच्यात उत्साह वाढतो, आत्मविश्वास निर्माण होतो आणि उदासीनता दूर होण्यास मदत मिळते.
पूना जेरियाट्रिक केअर सेंटर मधील जेष्ठांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेत आनंदाने जीवन जगण्याचा सुंदर मार्ग शोधला आहे. जेष्ठांप्रती आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता जपत सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून “यशस्वी वृद्धत्व” शक्य होते, हेच या संस्थेच्या कार्याचे खरे रहस्य आहे.
डॉ संतोष कनशॆटे See less

16/05/2026

पूना जेरियाट्रिक केअर सेंटर मध्ये ज्येष्ठांची खूप आपुलकीने काळजी घेणारी गौरी हिचा वाढदिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला.

13/05/2026

दरवेळेस सेंटर मध्ये प्रवेश करताच चिमण्यांच्या चिवचिवाटाने मन प्रसन्न होत असते ... पण आज सेंटर मध्ये येताच नवीन पक्षाच्या आवाजाने लक्ष वेधले जणू नवीनच पाहुणा यावा ... पण कळला नाही नेमका तो कोण पहा त्या आवाजावरून लक्षात येत का ते.... नेमका तो कोणता पक्षी ....

Address

Near Patangrao Kadam Bunglow, Agam Jain Temple, Ambegaon Kh , Katraj
Pune
411046

Telephone

9890060063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poona Geriatric Care Center - An Innovative Old Age Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Poona Geriatric Care Center - An Innovative Old Age Home:

Share