25/08/2026
दारू आणि तंबाखूचे व्यसन, कावीळ झाली होती आणि फिट आली होती… तरीही Patient म्हणतोय, “मी स्वतःहून व्यसन सोडू शकतो!” | काय करावे?
दारू आणि तंबाखूचे दीर्घकाळ सेवन शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. कावीळ आणि फिटचा इतिहास असलेल्या व्यक्तीने व्यसन अचानक स्वतःहून बंद करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.दारू बंद केल्यानंतर काही रुग्णांमध्ये Withdrawal मुळे थरथरणे, घाम येणे, अस्वस्थता, गोंधळ आणि पुन्हा फिट येणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात.
👉 व्यसन सोडण्याची इच्छा चांगली आहे; पण योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीचा उपचार घेणे अधिक सुरक्षित आहे.
व्यसनावर मात करा… पण सुरक्षितपणे आणि योग्य उपचारांसह.
#दारूचेव्यसन #तंबाखूचेव्यसन #व्यसनमुक्ती #कावीळ