Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra

Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra, Doctor, near ram mandir, on congress bhavan Road, Sangli.

05/07/2026

आता मी नाही बोलणार...
फक्त पेशंट बोलणार...
*"दीड वर्षांचा प्रवास... आणि दहा वर्षाच्या त्रासातून आज मी पूर्णपणे औषधमुक्त आहे!"*

नमस्कार,
काही वर्षांपूर्वी ज्या वेदना मी सहन करत होते, त्या आता फक्त आठवणी उरल्या आहेत.

संधिवातामुळे माझे हात-पाय खूप दुखायचे. सांध्यांना सूज यायची, सकाळी उठल्यावर सांधे हलवणे सुद्धा कठीण व्हायचं. त्यातच त्वचेवर लाल चट्टे, खाज आणि जळजळ यामुळे आत्मविश्वासही कमी झाला होता. अनेक प्रकारचे उपचार केले, वेगवेगळी औषधं घेतली; पण थोडा आराम मिळायचा आणि पुन्हा त्रास सुरू व्हायचा.

अशा वेळी मी डॉ. सचिन पवार सरांकडे आले. सरांनी माझी प्रकृती समजून घेतली, आयुर्वेदाच्या पद्धतीने पोट व नाडी परीक्षा करून निदान केले, सोबत सविस्तर मार्गदर्शन केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—मला आशा दिली.

उपचारांचा हा प्रवास सोपा नव्हता. पंचकर्म करून घेऊन दीड वर्ष औषधं, पथ्य नियमितपणे करत राहिले. कधी संयमाची परीक्षा झाली, औषधांमध्ये खंड पडाय�

07/06/2026

The Black Diamond
*आषाढातील जांभूळ :*
संकलन: डॉ.सचिन पवार एमडी आयुर्वेद

आषाढात जांभळाचे फळ येते. जांभळाच्या अमृता समान गुणांमुळे याला आषाढातील अमृतफळ म्हणतात.
संपूर्ण भारतात जांभूळ आढळते. संस्कृतमध्ये याला 'जम्बू' म्हणतात. म्हणूनच भारताचे एक नाव *जम्बूद्वीप* सुद्धा आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर....
जांभळाची चव तुरट-गोड असते, त्याचा स्वभाव थंड असतो आणि पचनानंतर ते शरीरात कोरडेपणा आणते. त्यामुळे ते जुलाब थांबवते, जास्त घाम येणे कमी करते आणि लघवीचे प्रमाण नियंत्रित करते.
सामान्य लोकांसाठी जांभळाचे मुख्य फायदे
A. मधुमेहातील संजीवनी
B. पचन सुधारते, जुलाब थांबवते.
C. उन्हाळ्यात जांभूळ सरबत घेतल्याने उष्णतेमुळे होणारे पोटाचे विकार कमी होतात.
D.रक्त शुद्ध करते व त्वचा उजळवते
E. हृदय आणि यकृताचे रक्षण करते.
Best for fatty liver
5. तोंडाचे आरोग्य
जांभळाच्या सालीचा काढा करून गुळण्या केल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, तोंड येणे थांबते, जिवाणूंची वाढ कमी होते.
6. जा�

31/05/2026

© डॉ सचिन पवार
एमडी आयुर्वेद सांगली.

सध्या उन्हाळा म्हणजेच *ग्रीष्म ऋतू* सुरू आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा चढताच राहत आहे. उन्हाचा तडाका एवढा आहे की काही केल्या समाधान वाटत नाही. दररोज रुग्ण तपासणी करत असताना डोळ्यांची रखरख , तोंड येणे, गुदभागी जळजळ असणे, मुळव्याध व त्यातून रक्त पडणे अशा प्रकारचे रुग्णांचे प्रमाण हे वाढले आहे हे पाहण्यात आले. कारण आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे.शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. त्यामध्ये काहीजण ताक, मठ्ठा, दही या गोष्टी खातात.( पण तसे पाहायला गेले तर हे सर्व पदार्थ गुणाने उष्णच आहेत त्यामुळे उष्णतेचा त्रास पुन्हा वाढू शकतो. 🎯 दूध तूप लोणी गुणाने थंड आहेत. ताक दही मठ्ठा उष्ण आहे).

या उष्णतेचा शरीराला त्रास होऊ नये म्हणून आपण वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यामध्ये प्रामुख्याने उष्णता वाढवणारे पदार्थ ख�

26/04/2026

आंबा ....

गेले बरेच दिवस आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या आंब्यावर ताव मारण्याची आता वेळ जवळ येत आहे... चला मग याच आंब्याबद्दलची थोडीशी माहिती आयुर्वेदिक दृष्टिकोनातून घेऊ या....

आयुर्वेदीय ‘योगरत्नाकर’ ग्रंथात त्याचे गुणगान पुढील श्लोकाद्वारे केले आहे.

*‘सन्तर्पणो य: सकलेन्द्रियाणां, बलप्रदो वृष्यतमश्च हृद्य:।*
*स्त्रीणु प्रहर्ष प्रचुरंददाति, फलाधिराज: सहकार एव।।’*

पिकलेला आंबा संतर्पण करणारा म्हणजेच संपूर्ण शरीराचा भरणपोषण करणारा आहे त्याच बरोबर तो संपूर्ण शरीर व इंद्रियांना बल प्रदान करण्याचे काम करतो.

आंबा हे फळ प्रजनन क्षमता व काम शक्ती वाढवणारे आहे.

तसेच तो हृदयास सुद्धा हितकारक आहे.

पिकलेला आंबा शक्तीवर्धक आणि अतिशय रुचकर आहे. आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते.

कैरी मध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकव�

22/03/2026

© डॉ.सचिन पवार एमडी आयुर्वेद *कशी असावी उन्हाळ्यातील फोडणी???*
आणि...
*काय घ्यावी या ऋतूमध्ये विशेष काळजी ????*
सामान्यपणे आपण ऋतू बदलला की आपले कपडे, पांघरूण बदलतो, फॅनच्या रेग्युलेटर चे बटन सुद्धा बदलतो *पण आहार कोणीच बदलत नाही,...फोडणी कोणीच बदलत नाही*

लसूण व आले ( होय,..खूप चांगले आहे माहीत असूनही ),मोहरी आणि मसाला सोडून फोडणी टाकता येईल का?????
याचा विचार कोण करत नाही.

वातावरणामध्ये उष्णता असताना असे पदार्थ टाळून आपण फोडणी देऊ शकतो.

*तेलामध्ये किंवा तुपामध्ये*
(फोडणीसाठी खोबरेल तेल किंवा तूपच या ऋतूमध्ये बेस्ट असते)
+
🌱जिरे,
🌱हळदपूड,
🌱कांदा,
🌱कढीपत्त्याचे एकच पान,
🌱सैंधव मीठ,
🌱धने,
🌱कोथिंबीर
🌱आणि पुदिना*
यांचा वापर करून आपण फोडणी दिली असता शरीराला उष्णतेचा त्रास सहज होत नाही.
आता पेशंट तपासताना लक्षात येते की प्रत्येकाला उष्णतेचा काही ना काही त्रास आहेच.
💧डोळ्यांची रखरख
💧लघवीला जळजळ
💧अंगावर लालसर पुरळ,त्याची खाज होणे
💧करटं(केस्तोड) उठणे
💧रात्री झोप शांत न लागणे
💧तळपायांची होणारी भगभग
💧केस गळणे व अकाली पांढरे होणे
💧 *फिशर,मुळव्याध* च्या पेशंटची संख्या तर बोलूच नका.‌
हा सगळा ऋतू बदलामुळे झालेला परिणाम असतो आणि या बदलानुसार आपण आपल्या दिनचर्ये मध्ये , आहारामध्ये बदल न केल्यामुळे शरीरामध्ये भरपूर उष्णता वाढते आणि अशी लक्षणे उत्पन्न होतात.
यासाठी आपण सर्वांनी *आठवणीने आवर्जून पाणी प्यायला हवे*.
गेल्या महिन्यात वातावरण सौम्य असल्यामुळे आपण कमी पाणी पिऊन हि चालत होते, पण या ऋतू मधील उष्णतेला आपण न्यूट्रल करायचं म्हणले तर *पाण्याचे प्रमाण मुबलक* असणे गरजेचे आहे.
सामान्यपणे या महिन्यामध्ये चांगले ऊन असल्याने *सर्व फळे आपण मनसोक्त खाऊ शकतो* पण त्यामध्ये सुद्धा *डाळिंब,संत्री,मोसंबी,नारळ पाणी,लिंबू सरबत,कोकम सरबत* यांचा वापर केल्याने आपल्याला विशेष फायदा दिसून येतो.

🎯रात्री एक लिटर पाण्यामध्ये वीस ग्रॅम धने भिजवून सकाळी हे पाणी गाळून अकरा वाजेपर्यंत थोडे थोडे पिऊन संपवावे.
🎯दूर्वा म्हणजे हराळीच्या मुठभर काड्या आणून, स्वच्छ धुऊन भाजीप्रमाणे चिराव्यात व मिक्सरमध्ये घालून चटणी करून त्याचा रस काढून एक कपभर प्यावा.
🎯 तळपायाला व माथ्यावरती खोबरेल तेल किंवा ब्राह्मी युक्त भृंगराज तेल जिरवा.
🎯 दररोज 1 चमचा प्रवाळयुक्त शुद्ध गुलकंद खावा.
🎯 मुक्तायुक्त कामदुधा या मात्रेचे सेवन करावे.

*काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही*

टीम
*डॉ. पवार आयुर्वेद*
पंचकर्म व रिसर्च सेंटर
राम मंदिर - काँग्रेस भवन रो

08/03/2026

आता मी नाही बोलणार...
फक्त पेशंट बोलणार....
*"मी फक्त पवार डॉक्टरांचीच औषधे घेणार...!"*

रक्तामध्ये वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर कधी नागिनी मध्ये म्हणजेच आयुर्वेदानुसार विसर्प या यादीमध्ये होईल हे सांगता येत नाही.
माझ्या जवळचे नातेवाईक, राजकारणातील एक प्रतिष्ठित व्यक्ती. एका राजकीय कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दगदगीमध्ये आठ दिवस *मोठ्या प्रमाणात चहाचे सेवन व त्या मानाने पाण्याचे प्रमाण कमी* गेल्यामुळे शरीरामध्ये वाढलेल्या उष्णतेचे रूपांतर मांडीवरती लहान पुरळ उठण्याने सुरुवात झाली आणि दोन दिवसात अगदी *भाजल्याप्रमाणे मोठे फोड* उठले. घरातील लोक घाबरले. त्यातून एवढ्या मोठ्या राजकारण्याला सूचना देणाऱ्या लोकांची कमी नव्हती.

पण कोरोना मध्ये अगदी श्वासही नीट घेता येत नसणाऱ्या अवस्थेतून फक्त आणि फक्त आपल्या आयुर्वेदाच्या चिकित्सेच्या जोरावरती पुन्हा पूर्ववत झाल्याचे भान ठेवून, सर्वांचा विरोध झुगारून *"मी फक्त पवार डॉक्टरांची च औषधे घेणार, काय व्हायचे ते होऊ दे "* असे ठणकावून सांगत दहा दिवस पूर्णपणे तिखट, मीठ बंद करून आमच्या आयुर्वेदाची औषधे प्रामाणिकपणे घेऊन पूर्णपणे बरे झालेले हे आमचे अण्णा ... राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व...

डॉ सचिन पवार एमडी आयुर्वेद
डॉ वैशाली पवार आयुर्वेदाचार्य

डॉ पवार आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
राम मंदिर-काँग्रेस भवन रोड, सांगली
संपर्क 9168337771

01/03/2026

*आयुर्वेद...*
*सर्वांना समजेल असा...*
*डॉ.सचिन पवार*
एमडी आयुर्वेद
स्वतःमध्ये, स्वतःच्या जीवनशैली -आहारामध्ये आयुर्वेदाच्या सहाय्याने बदल करून एखाद्या मोठ्या आजारातून कसे बाहेर येऊ शकतो किंवा त्या आजाराला कसे मुळापासून बरे करू शकतो हाच उद्देश ठेवून, प्रत्येक खेड्या-पाड्यापर्यंत आयुर्वेद पोचवायचा ध्येय ठेवून, *गेली पंधरा वर्षे* आम्ही आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करत आहोत.*आमचा अनुभव हीच आमची ताकद आहे.* आज दिघंची-आटपाडी पासून ते जत-संखपर्यंत,सोबत अथणी- चिकोडी -गोकाक पर्यंत प्रत्येक छोट्या गावांमध्ये आम्ही रुग्णसेवा दिलेल्या व्यक्ती आहेत. इथून पुढे अगदी विजापूर, बेळगाव पासून सुद्धा रुग्न येत आहेत. या तळागाळापर्यंत आयुर्वेद पोहोचवू शकलो याचे समाधान आहे.
बदलती जीवनशैली, पॅक फूड आणि फास्ट फूड मुळे आलेले नवीन आजार ही सध्या काळाची सर्वात मोठी भीती आहे. जर यातून बाहेर पडायचे असेल तर पुन्हा आयुर्वेदाला आपलेसे करण्याशिवाय पर्याय नाही.
फक्त औषध घेणे म्हणजे आयुर्वेद नसून स्वतःमध्ये बदल करणे, जीवनशैली आणि आहार बदलणे, सोबत आपली मानसिकता बदलून काम करणे म्हणजे आयुर्वेद आहे.
ज्यावेळी तुम्ही अशा गोष्टींची स्वतःमध्ये बदल करू लागता तेव्हा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि मोठ्या आजारातून तुम्ही उतरणीला लागता.

कोरोना काळानंतर मी आता असे बरेच रुग्ण पाहत आहे ज्यांच्यामध्ये स्थूलता,थायरॉईड , हृदयाचे विकार विस्मरण, ऊर्जा कमी आणि केस गळणे अशा बरेच नवे आजारांनी घर केले आहे. अशा आजारांमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी पंचकर्माचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे आणि आश्चर्य म्हणजे रुग्ण सुद्धा स्व इच्छेने "मला पंचकर्म करायचे आहे" म्हणून आमच्याकडे येत आहेत. अक्षरशः आठवडाभर नंबर लावून वेटिंग मध्ये थांबून लोक पंचकर्म करून घेत आहेत.
आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणे म्हणजे कष्टाला पर्याय नाही. जर अवघड पेशंट बरा करायचा असेल तर वैद्याने स्वतः औषध बनवणे गरजेचे आहे. स्वतः बनवलेल्या औषध चा वापर करून जेव्हा तुम्ही पंचकर्म करता तेव्हा त्याचा रिझल्ट तिसऱ्या माणसाला सहज लक्षात येणे इतपत दिसतो. सुरुवातीपासूनच आमचा स्व निर्मित औषधावर भर असल्यामुळे आम्ही उत्कृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे बनवू शकतो आणि त्यांचा वापर करून अवघड व्याधी आयुर्वेदाच्या माध्यमातून बरे करण्याचा प्रयत्न आमचा असतो. इथून पुढे असेच दर्जेदार औषधे बनवून रुग्णसेवा देण्याचा मानस राहील.
काळाची आयुर्वेदातील गरज पाहून अजून वृद्धिंगत रुग्णसेवा देता यावी, रुग्णाला ऍडमिट होऊन चिकित्सा घेता यावी

20/02/2026

आता मी नाही बोलणार...
फक्त पेशंट बोलणार...
शरीराचा वाढलेला ओझेपणा, फुगीरपणा ,
हरवत चाललेल्या संवेदना ...
यावरती रामबाण उपाय...
*(कोणतेही पथ्य नसलेले)*
*आयुर्वेदातील बस्ती पंचकर्म*

"आपल्या शरीरामध्ये एकदा जर वात वाढला तर तो काय काय नाटकं करेल याचा अंदाज न केलेलाच बरा."

तासगाव येथील शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य असणाऱ्या आंबवडे मॅडम यांच्या शरीरामध्ये वात वाढल्यामुळे विविध सांध्यामध्ये वेदना हातापायामध्ये मुंग्या येणे,शरीराला फुगीरपणा तसेच कमी होत चाललेल्या संवेदना अशी लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला या लक्षणांच्याकडे दुर्लक्ष करून नोकरी- घर- संसारात त्या गुरफूटून गेल्या होत्या. पण हळूहळू या सर्व गोष्टी त्यांना त्रास देऊ लागल्या तेव्हा त्यांनी जवळचा डॉक्टर गाठला. औषधाने तात्पुरता फरक पडला पण पुन्हा जैसे थे.असे चार-पाच डॉक्टर बदलून झाले पण फरक तात्पुरताच.
तेव्हा मात्र त्यांना आयुर्वेदाची आठवण झाली. *कारण कोणत्या गोष्टीचा मुळापासून उपचार करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही* आणि त्यांनी आपल्या डॉ. पवार आयुर्वेद,पंचकर्म व रिसर्च सेंटर या ठिकाणी वाताचा रामबाण उपाय म्हणजे बस्ती हे पंचकर्म करून घेतले आणि काय आश्चर्य ...या सगळ्या तक्रारी अशा फटाफट कमी होऊन शरीर हलके झाले.
त्या म्हणाल्या की "मी हे पंचकर्म अगोदर का बरं नाही केले. अशी बस्ती सारखी पंचकर्म चिकित्सा आपण दरवर्षी करून घ्यायला पाहिजे."

आमच्या सेंटरमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बस्ती हे पंचकर्म करून घेण्यासाठी बहुतांश शिक्षक वर्ग गर्दी करतात. कारण रोजचा प्रवास, धकाधकीतली नोकरी, विद्यार्थ्यांना शिकवायचे, बोर्ड चा वापर शिवाय इतर ताण वेगळाच.
यात फक्त बस्ती आणि शिरोधारा सारखे पंचकर्म चिकित्साच खूप सोप्या पद्धतीने बाहेर काढू शकतात.‌

डॉ सचिन पवार एमडी आयुर्वेद
डॉ वैशाली पवार आयुर्वेदाचार्य

डॉ पवार आयुर्वेद व पंचकर्म सेंटर राम मंदिर-काँग्रेस भवन रोड, सांगली
संपर्क 9168337771

Address

Near Ram Mandir, On Congress Bhavan Road
Sangli
416416

Telephone

+91 91683 37771

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Pawar ayurved, panchkarma & Garbhsanskar kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category