Meenakshi Digestive Disease Centre, Satara

Meenakshi  Digestive Disease  Centre, Satara Meenakshi Digestive Disease Centre, Satara ��

� Advanced Gastro & Liver Care
� Endoscopy | Colonoscopy | ERCP
� Expert Consultation & Treatment

Symbol of Knowledge ....
14/04/2025

Symbol of Knowledge ....

पाडव्याची नवीन पहाटघेऊन येवो तुमच्याजीवनात सुखाची लाटगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
30/03/2025

पाडव्याची नवीन पहाट
घेऊन येवो तुमच्या
जीवनात सुखाची लाट
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर सातारा येथे आम्ही पोटाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये इंडोस्कोपी चे अनन्यसाधारण महत...
19/03/2025

मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर सातारा येथे आम्ही पोटाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये इंडोस्कोपी चे अनन्यसाधारण महत्व नेहमीच अधोरेखित करत आलेलो आहोत.
बऱ्याच वेळा पोटाच्या तक्रारी या रुटीन पोट दुखी किंवा पित्ताचे आजार सोडून रुग्णांमध्ये काही वेगळे गंभीर आजारही अस्तित्वात असतात आणि अशा आजारांचे निदान सोनोग्राफी किंवा रक्ताच्या तपासण्यांमध्ये येत नाहीत परंतु जेव्हा इंडोस्कोपी केली जाते त्याच वेळेस असे गंभीर आजार निदर्शनास येतात व रुग्णास वेळेत निदान झाल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. गेल्या
पंधरा दिवसात एका रुग्णाचे जठराच्या कॅन्सरचे आणि एका रुग्णाच्या जठराच्या मोठ्या अल्सरचे निदान आपल्या इथे एन्डोस्कोपीद्वारे करण्यात आले. हे दोन्ही रुग्ण रक्तक्षय आणि पित्त अशा तक्रारी घेऊन गेले सहा ते सात महिने वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होते. त्यामध्ये फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट अशा बऱ्याच डॉक्टरां तर्फे तपासण्या केल्या, उपचार घेतले, रक्त चढवले परंतु काहीच फरक पडत नसल्याने हे रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी साठी आले. आम्ही त्यांची हिस्टरी घेऊन इतर तपासण्याचे रिपोर्ट तपासून त्यांना इंडोस्कोपी चा सल्ला दिला. इंडॉस्कोपी केल्या केल्या एका रुग्णाच्या जठरामध्ये कॅन्सर असल्याचे तर दुसऱ्या रुग्णाच्या जाठरामध्ये मोठा अल्सर असल्याचे व तिथून ब्लीडिंग होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. या दोघांच्याही अनेमियाचे हे खरे कारण कॅन्सर आणि अल्सर मधून होणारे ब्लीडींग होते जे दुर्लक्षित असल्याने रुग्णाचा अनेमिया बरा होत नव्हता. मग पेशंटच्या नातेवाईकांना हे दाखवून आम्ही सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली आणि पुढील उपचार कशा पद्धतीने करावयाची याचे मार्गदर्शन केले. आता एक रुग्ण पेट स्कॅन करून किमोथेरपी घेत आहे तर दुसऱ्या रुग्णाची बायोप्सी पेंडींग आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये निदान होऊन पुढील उपचाराची संधी आम्ही त्यांना देऊ शकलो याबद्दल आम्हालाही आनंद आहे. कदाचित हे रुग्ण आमच्याकडे लवकर आले असते तर त्याचे निदान लवकरही होऊ शकले असते. अशाच काहीशा गोष्टी आम्हास अनुभवास येतात व त्या समाजाला कळाव्यात. पोटाच्या रुग्णांमध्ये इंडोस्कोपीचे महत्व किती अनन्यसाधारण आहे लोकांनाही समजावे व रुग्णांचा फायदा होऊन त्यांचा जीव वाचावा हीच आमची मनोमन इच्छा आहे.

रंग प्रेमाचारंग स्नेहाचारंग नात्यांचानव्या उत्साहात साजरा करू सण धुलीवंदनाचा.
14/03/2025

रंग प्रेमाचा
रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा
नव्या उत्साहात साजरा करू सण धुलीवंदनाचा.

होळीच्या अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो. आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.
13/03/2025

होळीच्या अग्निमध्ये, निराशा,
दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो.
आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.

Address

Satara-Koregaon Road, Opposite Irrigation Office Gate 2, Vanwaswadi, Khed
Satara
415003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meenakshi Digestive Disease Centre, Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share