Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur

Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur, Solapur.

01/05/2026

*महाराष्ट्र दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या विविध विभागांकडून उत्साहात ध्वजारोहण संपन्न!*

सोलापूर : महाराष्ट्राच्या अभिमानदिनाचे औचित्य साधत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) जिल्हा शाखा, सोलापूर संचलित विविध विभागांच्या वतीने १ मे रोजी उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला. देशभक्तीच्या स्फूर्तीदायी वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागवली.
या सोहळ्यास नॅब संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अंकुश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. शशीभूषण यलगुलवार व सहसचिव तथा चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष माशाळे, ममता मूकबधिर विद्यालयाच्या अधीक्षक संगीता गायकवाड,राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड चे अधिक्षक सौरभ शिंगाडे, प्रशालेचे पर्यवेक्षक डॉ.बंडोपंत पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बोलताना श्री.अंकुश कदम यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत नव्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्शनपर शब्दांनी विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कासिम मुजावर यांनी प्रभावीपणे केले. तर चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष माशाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उत्साह, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशप्रेमाची भावना अधिक दृढ केली.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *नॅब संचलित ममता मूकबधिर विद्यालय मध्ये पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न* •••••••••••••••••••••••••••••••••...
22/04/2026

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*नॅब संचलित ममता मूकबधिर विद्यालय मध्ये पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
सोलापूर (प्रतिनिधी) – एन.ए.बी. संचलित *ममता मूकबधिर विद्यालय (निवासी)* , विकास नगर, सोलापूर येथे *पालक-शिक्षक मेळावा* उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी* नॅब संस्थेचे *उपाध्यक्ष मा.अंकुश कदम* सर होते, तर *प्रमुख पाहुणे* म्हणून नॅब संस्थेचे *सेक्रेटरी मा.शशिभूषण यलगुलवार* सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विशेष शिक्षिका सौ मेधा जोशी मॅडम* यांच्या *प्रस्तावनेने* झाली. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर तेजश्री श्रीरेखम मॅडम यांनी यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 चा सविस्तर मागील सभेचा इतिवृत्त अहवाल वाचन केले* सादर करत विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांतील सहभाग व यश अधोरेखित केले. *संगणक विषयाच्या परीक्षेमधील उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.शशी भूषण यलगुलवार सर* यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात *कार्यशाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव केला. *अध्यक्षीय भाषणात मा. अंकुश कदम सर यांनी* विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.या *मेळाव्यात पालक व शिक्षक यांच्यात प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी भविष्यातील दिशा निश्चित करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. *उपस्थित सर्व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला*.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन* *सौ उज्वला पराळे मॅडम* यांनी केले. हा मेळावा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा ठरला. सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Address

Solapur
413003

Telephone

+919096111786

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mamta Mukbadhir Vidyalay,Solapur:

Shortcuts

Share