Seth Govindji Raoji Ayurved Mahavidyalaya & Hospital

Seth Govindji Raoji Ayurved Mahavidyalaya & Hospital India's one of the oldest Govt Aided Jain Minority Ayurved Institute.

28/07/2026

तुमच्या पाल्याची वारंवार आजारी पडण्याची चिंता तुम्हाला सतावतेय का? 🤔 मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
आयुर्वेदानुसार 'पुष्य नक्षत्रा'वर लहान मुलांना दिला जाणारा सुवर्णप्राशन संस्कार त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत लाभदायी आहे. आपल्या सेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयात सुवर्णप्राशन देण्याची संपूर्ण प्रक्रिया किती शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडते, हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
✨ सुवर्णप्राशनाचे प्रमुख फायदे:
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते आणि वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
श्वसनाचे आजार दूर राहण्यास मदत होते.
मुलांची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढते (बुद्धिवर्धक).
शारीरिक आणि मानसिक विकास वेगाने होतो.
👶 वयोगट: जन्मापासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी.
दर महिन्याला पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर आपल्या रुग्णालयात लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन केले जाते. सोबतच, मुलांच्या प्रगतीची नोंद ठेवण्यासाठी एक विशेष कार्डही दिले जाते.
तुमच्या पाल्याच्या सुदृढ आणि निरोगी भविष्यासाठी आजच रुग्णालयाला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा! 👇
📍 पत्ता: सेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, सोलापूर.
📞 संपर्क: 0217-2324736, 8530078428

#सुवर्णप्राशन

सुवर्णप्राशन संस्कार, लहान मुलांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, पुष्य नक्षत्र, सोलापूर आयुर्वेद रुग्णालय, Suvarnaprashan benefits, Ayurvedic immunity booster, Solapur Ayurvedic hospital, Kids health care in Ayurveda.

20/07/2026

प.पु.श्रमण मुनीश्री 108 सुप्रभसागरजी यांच्या सोलापुरात ससंघ मंगल प्रवेश

17/07/2026

या व्हिडिओमध्ये आपल्या 'सेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयाच्या' स्वतः डॉ. कल्पना पांढरे (सहयोगी प्राध्यापिका, शल्य विभाग) यांनी पाईल्सची कारणे, लक्षणे आणि त्यावरील सुरक्षित आणि खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारांबद्दल थेट मार्गदर्शन केले आहे.
तुमच्या आरोग्याशी तडजोड करू नका. योग्य माहिती जाणून घ्या आणि वेळेवर तज्ञांचा सल्ला घ्या!
अधिक माहितीसाठी आणि उपचारांसाठी आजच रुग्णालयात संपर्क साधा. 🏥✨
📍 पत्ता: सेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, सोलापूर.
📞 संपर्क: 0217-2324736, 8530078428



( Piles treatment in Solapur, Best piles doctor in Solapur, Ayurved hospital Solapur, Seth Sakharam Nemchand Jain Ayurved Hospital, Dr Kalpana Pandhare Solapur, Ayurvedic doctor in Solapur, Piles specialist near me, मूळव्याध, मूळव्याध उपाय, मूळव्याध लक्षणे आणि कारणे, मूळव्याधावर आयुर्वेदिक उपचार, सोलापूर मधील सर्वोत्तम डॉक्टर, मूळव्याध कसा बरा करावा, Piles treatment, Hemorrhoids cure, Ayurvedic treatment for piles, Piles stages and symptoms, Piles surgery, Ayurvedic medicine for hemorrhoids, Fiber diet for piles, How to cure piles completely in Ayurveda, What are the symptoms of piles, Home remedies for piles in Marathi, Best hospital for piles treatment in Solapur)

शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात, सोलापूर येथे महाकवी कालिदास जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर महावि...
16/07/2026

शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात, सोलापूर येथे महाकवी कालिदास जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शांतीनाथ बागेवाडी, शैक्षणिक समन्वयक डॉ रेवणसिद्ध उस्तुरगे, संस्कृत संहिता सिद्धांत विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना गंगासागरे, डॉ. शिल्पा येरमे, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. स्मिता गोतीपामुल, डॉ. सीमा शहा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य डॉ. शांतीनाथ बागेवाडी, हस्ते महाकवी कालिदास प्रतिमा पूजन व दीपप्रजवलन करून णमोकार महामंत्र व धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये पीहु जैन या विद्यार्थीनीने कवी कालिदासाचे संस्कृत मध्ये चारित्र वर्णन केले. तर श्रृतिका आलते, सात्विका पाटील, सिध्दम गांधी हया विद्यार्थीनी रघुवंश, मेघदूत,अभिधानशान्कुतल हयावर काव्य वाचन प्रस्तुत केले. विद्यार्थीना डॉ.उस्तुरगे सर व डॉ.शहा सीमा हयांनी संस्कृत भाषेचे महत्त्व व त्याचे व आयुर्वेदातील योगदान पठवून सांगितले. अत्यंत उत्साह पणे या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली पाटील,आभार प्रदर्शन उमंग बाफना ह्याने केले. कार्यक्रमासाठी दिशेष परिश्रम अक्षरा कोठारी, उमंग बाफना, मनाली पाटील ह्यांनी घेतले.

Sanskrit Club Activity Successfully Conducted ✨The Department of Kriya Sharir successfully organized a Sanskrit Club Act...
03/07/2026

Sanskrit Club Activity Successfully Conducted ✨

The Department of Kriya Sharir successfully organized a Sanskrit Club Activity on 2 July 2026 at the Auditorium, with the aim of promoting the beauty of the Sanskrit language and its indispensable role in Ayurveda.

The session featured:
🗣️ Sanskrit introduction and conversation
🎭 Interactive Sanskrit role play
🎤 Student presentations on the relevance of Sanskrit in Ayurveda

Students enthusiastically participated in all activities, enhancing their pronunciation, communication skills, and understanding of classical Ayurvedic terminology. The programme served as an excellent platform to foster confidence in using Sanskrit while strengthening the foundation of Ayurvedic learning.

We extend our heartfelt appreciation to all the students, faculty members, and organizers for making the event a great success.

"संस्कृतं संस्कृतेः मूलम् – Sanskrit is the foundation of our rich cultural and Ayurvedic heritage."

StudentActivity LearningBeyondClassroom ClassicalWisdom AcademicExcellence

Sanskrit Club Activity Successfully Conducted ✨The Department of Kriya Sharir successfully organized a Sanskrit Club Act...
03/07/2026

Sanskrit Club Activity Successfully Conducted ✨

The Department of Kriya Sharir successfully organized a Sanskrit Club Activity on 2 July 2026 at the Auditorium, with the aim of promoting the beauty of the Sanskrit language and its indispensable role in Ayurveda.

The session featured:
🗣️ Sanskrit introduction and conversation
🎭 Interactive Sanskrit role play
🎤 Student presentations on the relevance of Sanskrit in Ayurveda

Students enthusiastically participated in all activities, enhancing their pronunciation, communication skills, and understanding of classical Ayurvedic terminology. The programme served as an excellent platform to foster confidence in using Sanskrit while strengthening the foundation of Ayurvedic learning.

We extend our heartfelt appreciation to all the students, faculty members, and organizers for making the event a great success.

"संस्कृतं संस्कृतेः मूलम् – Sanskrit is the foundation of our rich cultural and Ayurvedic heritage."

शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर येथील प्रथम वर्ष BAMS (2021 Batch) च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग...
29/06/2026

शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर येथील प्रथम वर्ष BAMS (2021 Batch) च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित हिवाळी 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.

🩸 "Cool तेच, जे जीव वाचवतात!" ❤️SGR आयुर्वेद महाविद्यालय आणि SSNJ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबि...
29/06/2026

🩸 "Cool तेच, जे जीव वाचवतात!" ❤️

SGR आयुर्वेद महाविद्यालय आणि SSNJ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर.

एक रक्तदान... अनेक जीवांना नवसंजीवनी!
चला, आपणही या जीवनदायी उपक्रमाचा भाग बनूया. ✨

#रक्तदान #जीवदान
spital

योग दिन उत्साहात साजराशेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात योग दिनानिमित्त माननीय संचालक आयुष संचालनालय मुंबई यांच्...
22/06/2026

योग दिन उत्साहात साजरा
शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात योग दिनानिमित्त माननीय संचालक आयुष संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार योगाभ्यासाचे आयोजन, ध्यानधारणा, व्याख्याने स्वस्थवृत्त विभागातर्फे घेण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांकरता विविध स्पर्धा आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, योगासन स्पर्धा, स्लोगन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी सामूहिक योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य वैदया वीणा जावळे उपप्राचार्य वैद्य शांतिनाथ बागेवाडी महाविद्यालयाचे समन्वयक श्री. अनुप दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. तसेच महाविद्यालयातील स्वस्थवृत्त विभाग प्रमुख प्राध्यापक वैद्य अमोल वेल्हाळ, वैदया सोनाली बगले यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महिला कर्मचारी व अधिकारी संघाचा महाविद्यालयात सत्कारपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर...
17/06/2026

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महिला कर्मचारी व अधिकारी संघाचा महाविद्यालयात सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठ महिला महोत्सवात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या संघाने विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पारितोषिके प्राप्त केली. या उल्लेखनीय यशाबद्दल तसेच महाविद्यालयास सदिच्छा भेट दिल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांच्या संघाचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वीणा जावळे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या संघाचे अभिनंदन करत त्यांच्या सांस्कृतिक, क्रीडा व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे कौतुक केले. त्यांनी अशा उपक्रमांमुळे कर्मचारी वर्गामध्ये संघभावना, आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

उपप्राचार्य डॉ. शांतीनाथ बागेवाडी यांनीही संघाच्या यशस्वी कामगिरीबद्दल शुभेच्छा देत भविष्यात अधिक उंची गाठण्यासाठी प्रेरणा दिली.

यावेळी शैक्षणिक समन्वयक डॉ. रेवणसिद्ध उस्तुरगे, विभागप्रमुख डॉ विद्यानंद कुंभोजकर, ग्रंथपाल महावीर लाळे उपस्थित होते.

Address

C/o Seth Sakharam Nemchand Jain Ayurved Hospital, Shukrawar Peth , Near Old Faujdar Chaudi
Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seth Govindji Raoji Ayurved Mahavidyalaya & Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Seth Govindji Raoji Ayurved Mahavidyalaya & Hospital:

Shortcuts

Share

Category