Orbit Pathology Laboratory

Call Directions Contact the practice

Orbit Pathology Laboratory Pathology Blood Testing

Happy New Year 2025 🎉🎊👏💥🔥💫🎁😍
31/12/2024

Happy New Year 2025 🎉🎊👏💥🔥💫🎁😍

03/11/2024
�🌸🌸🌸🌸🌸🌸🌸*सुवर्ण क्षणांच्या आठवणी,* *लक्ष्मी अक्षय तृतीयेच्या दिनी,**जीवनदीप जाई उजळूनी,**सुख समृद्धी लाभो जीवनी**भक्ती प...
10/05/2024

�🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*सुवर्ण क्षणांच्या आठवणी,*
*लक्ष्मी अक्षय तृतीयेच्या दिनी,*
*जीवनदीप जाई उजळूनी,*
*सुख समृद्धी लाभो जीवनी*
*भक्ती प्रेमरस ओथंबूनी,*
*बंधुभाव वाढेल जनगणमनी. *अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!*
*आपला दिवस आनंदात जावो.*
🌸🌸🌸🌸🌸

*एक सौंदर्य, एक नवीन उत्साह ,**एक नवीन स्वप्न एक कल्पना,**एक विश्वास, एक आस्था. एक चांगला विचार.**हीच आहे चांगल्या नवीन ...
01/01/2024

*एक सौंदर्य, एक नवीन उत्साह ,*
*एक नवीन स्वप्न एक कल्पना,*
*एक विश्वास, एक आस्था. एक चांगला विचार.*
*हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात.*
*आपणांस नवीन वर्षाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.*💐🍁

जय श्रीरामआज दिवाळीचा पहिला दिवस  #वसुबारस सर्वांना वसुबारस च्या मंगलमय शुभेच्छा... जिच्या पुजनाने दीपावली ची खरी सुरुवा...
09/11/2023

जय श्रीराम
आज दिवाळीचा पहिला दिवस #वसुबारस
सर्वांना वसुबारस च्या मंगलमय शुभेच्छा...
जिच्या पुजनाने दीपावली ची खरी सुरुवात होते त्या वात्सल्यरुपी गाय वासरा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस

गोमाता आणि तिचे वासरू यांच्या नात्यातील नितळ प्रेम, माया, उदारता, वत्सलता, करुणा आणि मांगल्य आपणा सर्वांना लाभो अश्या शुभेच्छा.

Coll for me and test --7447227008
02/11/2023

Coll for me and test --7447227008

28/10/2023
💐💐🙏🙏💐💐
23/07/2023

💐💐🙏🙏💐💐

*गुरु*आज गुरुपोर्णिमा आहे. गुरुंविषयी आदर व प्रेम दाखवण्याचा आजचा दिवस. ज्यानं कोणी आपल्याला आयुष्यात काही तरी चांगल्या ...
03/07/2023

*गुरु*
आज गुरुपोर्णिमा आहे. गुरुंविषयी आदर व प्रेम दाखवण्याचा आजचा दिवस. ज्यानं कोणी आपल्याला आयुष्यात काही तरी चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या व्यक्तिविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. इतकंच नाही तर माणसांशिवाय अन्य प्राणी, निसर्ग, यांनी देखील काही शिकवलं असेल तर त्याची आठवण ठेवण्याचा हा दिवस. आईवडील, शिक्षक, मित्र, भाऊबहिण, पती पत्नी हे आपल्या जवळचे आणि हक्काचे गुरु असतात. यांच्याशिवाय आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो अशाही व्यक्ती असतात. पुस्तके हा जसा आपला उत्तम मित्र असतो तसाच तो उत्तम गुरुही असतो. आयुष्य तर गुरुंचाही गुरु असतो.
तेव्हा एक प्रश्न असा पडतो की गुरु कोणाला करावं किंवा मानावं हा. कारण तो तुमच्या आयुष्याचा भलाबुरा निर्णय करणार असतो.
त्यामुळेच गुरु जसे आपले शिष्य निवडून घेतात तसेच शिष्यालाही आपला गुरु निवडण्याचा अधिकार असला पाहिजे असं चांगल्या गुरुचं म्हणणं असतं. नरेंद्रने आपल्या गुरुंची ही परीक्षा केली होती. म्हणूनच ते पुढे स्वामी विवेकानंद होऊ शकले.तसेच सर्वज्ञ श्री चक्रधरांनीही नागदेव भट्टांना गुरुची परीक्षा पाहुनच गुरु करा असे सांगितले त्यामुळेच ते पुढे नागदेवाचार्य बनले. पण गुरु जर चुकीचा केला तर शिष्य संकटात सापडलाच म्हणून समजा. एकलव्याने द्रोणाचार्याला गुरू केलं आणि तो आपला अंगठा गमावून बसला. कर्णाने परशुरामाला गुरू केलं आणि ऐन युद्धाच्या रणधुमाळीत त्याला शस्त्रांचं विस्मरण होईल असा शाप मिळाला. गुरुचा अर्थ होतो विशाल. पण हे दोन्ही गुरु कोत्या (कुजक्या) मनाचे होते.
त्यामुळे आपण गुरु कोणाला म्हणायचं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. सध्या सगळीकडे गुरूंचा बाजार भरला आहे. एकाच्या मागे दुसरा असं करत सारे त्यांच्या नादी लागतात. मग त्यांचं पितळ कधीतरी उघडं पडतंच. आपली आयुष्यातली अस्थिरता आपल्याला घालवायची असते, आपल्याला कोणी उचीत मार्गदर्शन करावं ही आपली इच्छा असते, कोणीतरी आपल्याला म्हणावं की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू लढत रहा. पण यातून आपण घाई करतो आणि संकटात पडतो. एकवेळ गुरु नसेल तरी चालेल, पण चुकीचा, कोत्या मनाचा, दुष्ट बुद्धीचा, गुरु मात्र कधीच नको.
मग गुरुची परीक्षा कशी करायची? खरा तर गुरु हा मूळात खरा माणूस असतो. माणूसकीची सारी लक्षणं त्याच्यात असतात. तो किंवा ती कधीही आपल्या गुरुपणाचा बडेजाव मिरवत नाहीत. सामान्य माणसासारखेच ते आपला दिनक्रम चालवत असतात. ते कधीही कोणाकडून आपली सेवा करवून घेण्याचा आग्रह करत नाहीत, दक्षिणा दे म्हणून शिष्यांवर ओरडत नाहीत, शिष्यांमध्ये लहानमोठा असा भेदभाव करत नाहीत. ही यादी आणखीही लांबवता येईल.गुरु हा कृष्णासारखा असतो. गुरु प्रसंगी अर्जुनाच्या घोड्यांना खराराही करतो कारण त्यांनी जोमाने पळावं यासाठी आणि दुसरीकडे तो अर्जुनाला गीतोपदेश करतो त्यानं त्याचं आयुष्य चांगलं जगावं म्हणून. खरा गुरु हा नेहमी सांगतो की केवळ मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घेऊन माझ्या शब्दांची खात्री करून घ्या आणि पटलं तरच त्याच्यावर विश्वास ठेवा. माझी अंधभक्ती करू नका. कारण अशा अंध निर्बुद्ध शिष्यांमुळे गुरुच गोत्यात येतात.
खरा गुरु तसं पाहिलं तर काहीच शिकवत नाही. तो फक्त एक चांगलं आयुष्य जगतो ज्यातून त्याच्या शिष्याला शिकून घ्यायचं असतं. निरनिराळ्या प्रसंगी गुरु कसा वागला, बोलला, चालला, हे बघत ऐकतच शिष्याला आयुष्य कळू लागतं. त्याच्या प्रश्नांचीही उत्तरं मिळू लागतात. खरा गुरु कधीच शिष्यांच्या नादी लागत नाही. शिष्यच त्याला हुडकत येतात. हा गुरु कधीही आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन मांडत नाही. तो कधी शिष्याकडून कसलीही अपेक्षा ठेवत नाही. अगदी त्यानं आपल्याला मानावं, किंवा त्याचं जगणं सुखाचं व्हावं अशीही. तो फक्त देण्याचं काम करतो. पावसासारखं. आता त्यांत बीजं अंकूरतात, वाढतात, फुलतात, फळतात, मोठी झाडं होतात तर दगड दगडच राहतो. ज्याची जशी पात्रता तसा त्याला लाभ होतो. गुरु हे दीपस्तंभासारखे असतात. शिष्यानेच त्यांना बघून आपल्या जगण्याचा किनारा गाठायचा असतो, मग अंधार असो वा वादळ असो.
त्यामुळेच गुरु निवडणं ही शिष्याची जबाबदारी असते. आणि जे शिष्य हुशार असतात ज्यांच्यात स्वतः गुरुंइतकीची तोलामोलाची प्रतिभा असते, तेच चांगले गुरु शोधून काढतात. ते गुरुविषयी असूया मनात ठेवत नाहीत. गुरुही त्यांच्याविषयी द्वेष, स्पर्धा ठेवत नाही. तिथे वयाचा प्रश्न येत नाही. जाती-धर्माचा, लिंगाचा, रंगाचा, पैशांचा, नात्याचा प्रश्न येत नाही. नातं असतं ते केवळ ज्ञानाचं, प्रेमाचं, आदरभावाचं आणि निखळ माणूसकीचं. असा गुरु लाभणं ही अत्यंत मोलाची गोष्ट असते. तो तुम्हालाही लाभो या सदिच्छेसह गुरुपोर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा

Address

Surat

Telephone

+919665067876

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Orbit Pathology Laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Orbit Pathology Laboratory:

Shortcuts

Share