04/02/2026
काही आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीत जेव्हा असे शब्द वाचायला मिळतात.
अनुभव १ :
गेल्या शनिवारी मी माझ्या पत्नीकरिता आमच्या फॅमिली होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांच्याकडे मी माझ्या सर्दी साठी ट्रीटमेंट घेत होतो. बेंगळुरूला आल्यापासून माझ्या आयुष्यात सर्दी हा जणू कायमचा पाहुणाच झाला होता. गेली दोन-तीन वर्षे नियमित होमिओपॅथिक उपचार सुरू होते, तरीही वातावरणातील बदल, धूळ आणि प्रदूषण यामुळे सर्दी पुन्हा पुन्हा होतच राहायची. तेव्हा वाटायचं, हे असंच आयुष्यभर चालणार का?
मे महिन्यात मी एमबीएम जॉईन केलं आणि हळूहळू माझं आयुष्य बदलू लागलं. नियमित व्यायाम, आहारातील शिस्त आणि स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. अवघ्या एक-दीड महिन्यातच मी होमिओपॅथिक औषधं थांबवली आणि आश्चर्य म्हणजे, जवळजवळ नऊ महिने झाले तरी सर्दीचा त्रास पुन्हा झाला नाही.
नऊ महिन्यांनंतर डॉक्टरांना भेटलो तेव्हा त्यांनी काळजीपूर्वक विचारलं, “इतकी महिने आलात नाहीत, आता काही त्रास होत नाही का? इतर काही ट्रीटमेंट घेत आहात का?” तेव्हा मी त्यांना एमबीएममधून मिळालेलं शिस्तबद्ध जीवन, केलेले आहारातील बदल आणि नियमित एक्सरसाइज याबद्दल सांगितलं.
माझं बोलणं ऐकून डॉक्टर खूप आनंदी झाल्या. त्यांनी सांगितलं की माझं शरीर आता पूर्वीपेक्षा अधिक सुदृढ आणि निरोगी दिसत आहे; मसल्सही स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो समाधानाचा भाव पाहून माझ्या डोळ्यांत समाधान आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली. तो क्षण मला आतून खूप काही देऊन गेला. आरोग्य म्हणजे खरंच आयुष्यातील सर्वात मोठं भांडवल आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा.
अनुभव २ :
हा अनुभव केवळ करिअरचा नाही, तर माझ्या मानसिक बदलाचा आणि आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा आहे, जो मला एमबीएममुळे मिळाला.
नोव्हेंबर महिन्यात माझ्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात जवळजवळ वीस वर्षांचा अनुभव असूनही, आणि गेली अकरा वर्षे एकाच कंपनीत एका विशिष्ट प्रॉडक्टवर काम करूनही, अचानक मला माझ्या सध्याच्या ग्रुपमधून पूर्णपणे नवीन ग्रुपमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. ज्या प्रॉडक्ट्सवर मी कधीच काम केलं नव्हतं, ज्या गोष्टी मला फक्त नावाने माहित होत्या , त्या सगळ्यांमध्ये काम करायचं होतं.
पूर्वीचा मी असतो, तर कदाचित घाबरलो असतो… नाराज झालो असतो… तक्रार करत बसलो असतो....प्रश्न विचारत बसलो असतो आणि सरते शेवटी“हे माझ्याच बाबतीत का?” असा विचार करत बसलो असतो.पण यावेळी काहीतरी वेगळंच घडलं.
नवीन मॅनेजमेंटने माझ्या नवीन जॉब रोलसाठी इंटरव्यू घेतला. एवढ्या वर्षांचा अनुभव आणि गेल्या नऊ-दहा महिन्यांत एमबीएममुळे तयार झालेला आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन आणि मानसिक स्थैर्य याच्या जोरावर मी तो इंटरव्यू पूर्ण विश्वासाने दिला. यावेळी मात्र मनात भीती नव्हती - फक्त शांतता होती.
आणि जे घडलं, ते माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं.३१ डिसेंबरला HR कडून फोन आला, नवीन जॉब रोल तर मिळालाच, पण प्रमोशनही झालं होतं.गेले अनेक वर्षे ज्या प्रमोशनची मी वाट पाहत होतो, ते एका अनपेक्षित इंटरव्यूबरोबर माझ्या आयुष्यात आलं. त्या क्षणी शब्दच कमी पडले.
माझ्यासोबत इतर काही जणांचीही जॉब फंक्शनॅलिटी बदलली; अनेकजण अजूनही त्याविरोधात बोलत आहेत, तक्रारी करत आहेत. पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच शांतता आहे. परिस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची ही ताकद कुठून आली, हे कळत नाही. पण मागे वळून पाहिल्यावर एकच उत्तर सापडतं - एमबीएम आणि सुशील सर.
त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे, सकारात्मक सेशन्समुळे आणि नेहमीच्या प्रोत्साहनामुळे ही मानसिकता हळूहळू, पण ठामपणे तयार झाली आहे. आज मला प्रत्यक्ष अनुभव येतोय की सातत्य आणि सकारात्मक विचार आयुष्याला किती वेगळं वळण देऊ शकतात.
वाईट परिस्थितीतही मार्ग कसा शोधायचा, आणि जे आहे त्यातही सकारात्मक राहून पुढचा विचार कसा करायचा हे सुशील सर आम्हाला फक्त शिकवत नाहीत, तर जगायला शिकवत आहेत.
मनापासून, पुन्हा एकदा सुशील सरांचे आणि एमबीएमचे आभार. 🙏आज जो मी आहे, त्यामागे तुमचा खूप मोठा वाटा आहे.