Dr Sonali Sawant

Directions Website

Dr Sonali Sawant Doctor Sonali Sawant
VishwaSwaroop Ayurved & Panchkarma
Award-Winning Ayurveda Expert

03/10/2026

नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे? मग आयुर्वेदातील हे ३ सोपे उपाय नक्की करा!

पूर्वीच्या तुलनेत आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे (sedentary lifestyle) आणि उशिरा होणाऱ्या लग्नांमुळे सिझेरियनचे (C-section) प्रमाण खूप वाढले आहे. पण आयुर्वेदातील 'गर्भिणी परिचर्या' नुसार गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये काही सोपे उपाय केल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. शेवटच्या दोन महिन्यांत दूध आणि तूप टाकून तांदळाची खीर खाणे, तसेच वैद्यांच्या सल्ल्याने 'योनी पिचू' आणि 'अनुवासन बस्ती' (तेलाचा एनेमा) घेणे यामुळे शरीरातील वात शांत होतो आणि ओटीपोटाचे स्नायू सैल होऊन प्रसूती सुलभ होते.

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​​

01/10/2026

गरोदरपणात ही ३ फळं खायला अजिबात विसरू नका!

गरोदरपणात होणारे शारीरिक त्रास कमी करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आहारात तीन फळांचा समावेश नक्की करावा. पहिले म्हणजे केळ, ज्यातील व्हिटॅमिन B6 मुळे मळमळ (Nausea) कमी होते आणि पोटॅशियममुळे पायात येणारे गोळे थांबतात. दुसरे फळ सफरचंद, ज्यात भरपूर फायबर असल्याने पोटाचे त्रास आणि बद्धकोष्ठता (Constipation) दूर होते. तिसरे महत्त्वाचे फळ म्हणजे डाळिंब; यातील भरपूर आयर्नमुळे (Iron) रक्तवाढ होते आणि अशक्तपणा व थकवा दूर होतो. दररोज एक केळ, एक सफरचंद आणि अर्धी वाटी डाळिंब खाणे गर्भिणीसाठी खूप फायदेशीर ठरते, फक्त शुगर असल्यास वैद्यांच्या सल्ल्यानेच याचे प्रमाण घ्यावे.

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​​

30/09/2026

Follow करा Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai

27/09/2026

तुमच्या मुलालाही वारंवार सर्दी, खोकला आणि ताप येतोय का?

आयुर्वेदात लहान मुलांच्या आरोग्यासाठी 'सुवर्ण प्राशन' हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार सांगितला आहे. हे एक प्रकारचे औषधी तूप (Medicated Ghee) असते, जे नियमित दिल्यास मुले वारंवार होणाऱ्या सर्दी, खोकला आणि तापापासून दूर राहतात. १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना हे दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि मुले कमी आजारी पडतात, असा अनेक पालकांचा अनुभव आहे..

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​​

25/09/2026

हार्मोन बिघड खराब होण्याची 8 सुरुवातीची लक्षणे!

महिलांच्या शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा जाणवणे आणि हनुवटीवर खूप मुरुम येणे असा त्रास होत असेल, तर हे हार्मोनल इम्बॅलन्सचे संकेत असू शकतात. यासोबतच केस गळणे, मूड स्विंग्ज, झोपेच्या समस्या आणि मानेवर काळेपणा येणे ही देखील हार्मोन्स बिघडण्याची सुरुवातीची लक्षणे आहेत, ज्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​​​

25/09/2026

Follow करा

23/09/2026

PCOD चा त्रास होतोय? या ३ सवयी आजच बदला!

PCOD २-३ महिन्यांत नैसर्गिकरित्या बरा करायचा असेल, तर या ३ सोप्या सवयी नक्की पाळा. जास्त प्रमाणात दूध पिणे टाळा आणि त्याऐवजी नारळ किंवा बदामाचे दूध वापरा कारण दुधातील औषधांचा थेट परिणाम हार्मोन्सवर होऊ शकतो. एकाच जागी न बसता नियमित व्यायाम करा, आणि रात्री उशिरा जड जेवण्याऐवजी सूप घ्या. या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यात मोठा बदल घडवू शकतात.

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​​

21/09/2026

केस गळती थांबवण्यासाठी फक्त बाहेरील उपाय करून थकलात?

केस गळण्यामागे शरीरातील आयर्न, फॉलिक ॲसिड आणि विटामिन सी ची कमतरता हे मुख्य कारण असू शकते. केवळ तेल किंवा सिरम लावण्याऐवजी, आयुर्वेदात सांगितलेला 'अळीव'चा उपाय नक्की करून पहा. रात्री भिजवलेला १ चमचा अळीव सकाळी १ कप दूध आणि अर्धा चमचा तुपासोबत उकळून घेतल्यास केसांना मुळापासून पोषण मिळते आणि त्यांची उत्तम वाढ होते. (टीप: ज्यांना पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी वैद्यांच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा).

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​

19/09/2026

तुम्हीही रोज गरम पाण्याने केस धुता?

गरम पाण्याने केस धुतल्यामुळे डोक्याच्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा आणि तेल कमी होते, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन केस गळती सुरू होते. यावर एक उत्तम उपाय म्हणजे खोबरेल तेलात पाव चमचा मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने टाकून १५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. हे तेल आठवड्यातून २-३ वेळा आंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावून छान मसाज करा. मेथी आणि कढीपत्त्यामुळे केसांना पोषण मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते. तसेच, केस धुताना नेहमी साधे किंवा कोमट पाणीच वापरा, गरम पाणी वापरू नका

अशाच Ayurvedic Wisdom साठी फॉलो करा: Dr Sonali Sawant | MD Ayurved | Mumbai 🧘‍♀️🌸

​​

Address

B/103, Apollo/Pride Enclave Building , Baji Prabhu Deshpande Marg, Vishnunagar, Naupada, Thane West, Next To Thane Bharat Sahakari Bank, Thane
Thane
400602

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm
Sunday 8am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sonali Sawant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category