07/08/2026
**जागतिक स्तनपान सप्ताह** निमित्त आयोजित करण्यात आलेल्या आठवडाभर चाललेल्या विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचा आज यशस्वी समारोप झाला.
या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे योग्य परीक्षण, मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व मान्यवर परीक्षकांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
आपल्या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
आजच्या कार्यक्रमामध्ये मान्यवर व्याख्याते **डॉ. स्नेहा देशमुख मॅडम, डॉ. मानसी कुलकर्णी मॅडम आणि डॉ. अफरीन नदाफ मॅडम** यांनी दिलेल्या ज्ञानवर्धक व मार्गदर्शक व्याख्यानाबद्दल मनःपूर्वक आभार.
आपण आमच्या विनंतीचा मान राखून आपल्या बहुमूल्य वेळातून विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्याख्यान दिले. आपल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विषयाची अधिक सखोल माहिती मिळाली.
आपल्या सहकार्याबद्दल व अमूल्य योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. 🙏