01/04/2025
*श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डी.*
अर्जदार/रुग्णांसाठी सूचना
१) अर्ज कसा करावा ?
अ) अर्जदार हा रेशनकार्डमध्ये असलेल्या नावांपैकी एक व्यक्ती असावा.
ब) रेशनकार्डची स्वःसाक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावी.
क) रुग्णालयाच्या लेटरहेडवर खर्च, खर्चाची रक्कम अंकी व अक्षरी, शस्त्रक्रिया असेल तर शस्त्रक्रियेची तारीख / उपचार असेल तर उपचाराचा कालावधी, उपचाराचा तपशीलवार खर्च घ्यावा.
ड) सादर रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना, तत्सम योजनेचा लाभार्थी नाही असा स्पष्ट उल्लेख असावा.
इ) रुग्णालय खर्चाच्या प्रमाणपत्रावर रुग्णालय प्रशासक यांचा सही व शिक्का, नाव, मोबाईल नंबरचा उल्लेख असावा.
२) उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र
अ) प्रतिज्ञापत्र हे रुग्ण अगर रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तीने तहसीलदार किंवा नोटरी यांच्या स्वाक्षरीने करावे. यामध्ये रेशनकार्डमधील सर्व व्यक्तींची संपूर्ण नावे, वय, नातेसंबंध, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न व रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना, तत्सम योजनेचा लाभार्थी नाही असा स्पष्ट उल्लेख असावा.
३) आवश्यक कागदपत्र
अनुदान मागणी अर्ज, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, उत्पत्राबाबतचे प्रमाणपत्र, आधारकार्ड.
*संस्थानकडून खालील आजारांवर मदत केली जाते.*
१) कर्करोगासंबंधी उपचार, शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार..
२) रक्तासंबंधीचे आजार.
३) जी. बी. एस.
४) सर्व प्रकारचे प्रत्यारोपण, शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार.
५) कॉकलर इम्प्लांट शस्त्रक्रिया.
६) हृदय शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार.
७) मेंदूच्या शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार.
८) मणका शस्त्रक्रिया
*महत्वाची सुचना-*
▶ रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना, तत्सम योजनेचा लाभार्थी असल्यास संस्थानमार्फत अनुदान दिले जात नाही.
▶ वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता शस्त्रक्रियेच्या तारखेपासून (१०) दहा दिवसाच्या आत करावी अन्यथा अर्ज नामंजूर होईल.
*महत्त्वाची सूचना : रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा. (कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलीही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये.)*
*राजेंद्र ढगे 8010795101*
*आमची वसई रुग्णमित्र*
*Rajendra Consultancy*
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट शेअर करा रुग्णमित्र पेज लाईक शेअर फॉलो करा!