VishwaSadhana Ayurveda

VishwaSadhana Ayurveda Shri VishwaSadhana Clinic is run by
Ayurvedacharaya Dr Milind Sajjanwar

Since 2009 , Dr Milind Sajjanwar the Ayurvedic Doctor has been working on the betterment of health for everyone. This holistic healing practice takes care of chronic ill patients all over the region and even from outside India. For the past 12 years our mission is to provide a long term sustainable health solution through Ayurveda for every kind of illness or pain, during all stages of human's life.

नानक नाम चढ़दी कला, तेरे भाणे सरबत दा भलागुरु नानक देव जी, गुरुपूरब निमित्त हार्दिक शुभेच्छा!.                          ...
05/11/2025

नानक नाम चढ़दी कला, तेरे भाणे सरबत दा भला
गुरु नानक देव जी, गुरुपूरब निमित्त हार्दिक शुभेच्छा!.

भाऊ बीज निमित्त हार्दिक शुभेच्छा !
23/10/2025

भाऊ बीज निमित्त हार्दिक शुभेच्छा !

🌼 “रांगोळीच्या रंगांनी सजू दे आयुष्य, दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊ दे स्वप्नं!” दीपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा!          ...
20/10/2025

🌼 “रांगोळीच्या रंगांनी सजू दे आयुष्य, दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊ दे स्वप्नं!” दीपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा!

ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरयेअमृतकलश हस्ताय सर्वामयविनाशनाय त्रिलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमःधनत्रयोदशी निमित्त मंगलम...
18/10/2025

ॐ नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये
अमृतकलश हस्ताय सर्वामयविनाशनाय
त्रिलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः

धनत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

11/10/2025

#मदनफळ/ गेळफळ

Emetic Nut

Randia dumetorum

उत्कृष्ट वामक द्रव्य, वमन कर्मासाठी याच्या बियांचा काढा करून वापरतात.

☘️
🌲🌴🌿🌾🌹🐆

शशिना च निशा निशया च शशी |शशिना निशया च विभाति नभः ||शरद पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !                            ...
06/10/2025

शशिना च निशा निशया च शशी |
शशिना निशया च विभाति नभः ||

शरद पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

https://www.facebook.com/share/r/1B8eSsUgYU/?mibextid=wwXIfr  #कोजागिरी_पौर्णिमा_व_दम्याचे_औषध            पावसाळा संपताच...
05/10/2025

https://www.facebook.com/share/r/1B8eSsUgYU/?mibextid=wwXIfr

#कोजागिरी_पौर्णिमा_व_दम्याचे_औषध


पावसाळा संपताच हिवाळा सुरू होण्यापूर्वी वातावरणामध्ये काही काळ कमालीची उष्णता जाणवू लागते. ज्याला आपण सर्वसाधारणपणे ’सप्टेंबर-ऑक्टोबर हीट’ म्हणुन ओळखतो. तो शरद ऋतु होय. मराठी महिन्यानुसार अर्धा भाद्रपद-अश्विन-अर्धा कार्तिक असा शरद ऋतुचा कालावधी आहे. यातील अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा होय. याला आपण सर्व ’कोजागिरी पौर्णिमा’ म्हणुन साजरी करतो.
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शितल प्रकाशछायेत गच्चीवर किंवा अंगणात मजेशीर गप्पा करत शिजवलेली खीर वा आटवलेली दुध पिण्याचा आंनद लुटणे हा दरवर्षीचा प्रघात आहे. पण फक्त ही मजेसाठीची रीत नसून यामागे शास्त्रीय कारणे आहेत.
आयुर्वेदामध्ये रक्ताच्या फेसापासून फुफ्फुसाची निर्मिती होते असे वर्णन आहे. यावरूनच रक्तधातुचा व फुफ्फुसाचा ( lungs ) चा फार निकटचा संबंध स्पष्ट होतो. तसेच पित्तदोष हे रक्तधातुच्या आश्रयाने सर्व शरीरात अव्ययाहत वाहत असते. तेव्हा रक्ताचा व पित्ताचा संबंधही इथे दिसून येतो. जेव्हा शरदऋतुतील प्रखर उष्णतेने उष्ण व तिक्ष्ण गुण वाढून पित्त अती प्रमाणात वाढायला लागते तेव्हा रक्तधातुही बिघडायला लागतो. कालांतराने त्याचा परीणाम फुफ्फुसांवरही दिसून येतो व पर्यायाने उष्णतेचे व श्वसनासंबंधी विकार उद्भवू लागतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता उत्तरोत्तर कमी होऊन दम्या सारख्या आजाराला निर्माण करतात. यालाच आधुनिक शास्त्रामध्ये ब्रॉकिअल अस्थमा असे म्हणतात.
अस्थमा सारख्या आजारांमध्ये फुफ्फुसांमध्ये कफाचा अडथळा कमी करून शक्यतोवर उपचार केले जातात. प्रत्येकच वेळेस दम्याचा त्रास व्हावयास लागला की श्वसनाचा अडथळा तात्पूरता घालवून वर्षानुवर्षे औषध खात असतो. या सगळ्यामध्ये त्याच्या फुफ्फुसाच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी कुठल्याही औषधाचा उपयोग केल्या जात नाही. म्हणुन रुग्णाला काही कालांतराने याप्यत्व ( आजार पूर्णत: बरा करण्यास कठीण ) येते.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे शितलता पूर्णत्वास प्राप्त असते. चंद्राच्या शितल किरणांमध्ये विशिष्ट असे चुंबकीय शक्ती ह्या काळात पृथ्वीवर अधिक मात्रेत वाहत असते, असे संशोधनाअंती आढळून आले आहे. म्हणुनच पूढील पद्धतीने जर कोजागिरी पौर्णिमेला शीजवलेली खीर / दुध पथ्ये पाळून सेवन केली तर पित्ताचे, उष्णतेचे व श्वसनासंबंधीचे सर्व आजारांवर ताबा मिळवता येतो.
काकडशिंगी, पिंपळी, कचूर, भारंगी, बांबूच्या पानांचा रस, वंशलोचन व तुळशीच्या मंजीर्‍या इ. औषधे दुधामध्ये शरदातील चंद्राच्या शीतल प्रकाशछायेत शिजवावे किंवा एक वाटी तांदूळ, दुध व औषधी एकत्र शीजवून त्याची खीर बनवावी. रुग्णाने ही खीर स्वत:च्या हाताने बनवावी. रात्री १२ नंतर आटवलेले दुध, खीर सेवन करावी. औषधाच्या चार तास आधी व नंतर काहीही खाऊ नये. शक्यतोवर पहाटे चार पर्यंत जागरण करावे. दुसर्‍या दिवशी सकाळपासून पूर्ण दिवस लंघन ( उपवास ) करावा.
अशा पद्धतीने जर सर्व पथ्ये पालन करून औषधी सेवन केल्यास शरीरामध्ये विरेचन क्रिया आपोआपच घडून येते. त्याद्वारे शरीरातील वाढलेले पित्त, उष्णता जुलाबावाटे शरीराबाहेर पडते. शरीर शुद्ध होते. पर्यायाने उष्णतेचे आजार अंग खाजविणे, केस गळणे, छातीत जळजळ, अम्लपित्त, डोळ्यांची जळजळ, तळपाय व तळहातांची होणारी जळजळ लगेच कमी व्हायला लागते. अर्थातच ह्याच्या जोडीला नियमीत औषधोपचार, पथ्येपालन, ऋतुनुसार पंचकर्मे आणि योग प्राणायामाची साथ मिळाली तर दुग्ध शर्करा योगच !
दुध हे स्वत: विरेचक ( जुलाब करणारे ) औषध आहे. म्हणुन स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा अश्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला सर्व पथ्ये पाळून चंद्राच्या शीतलतेने युक्त असे हे दुध सेवन केल्यास स्वास्थ्यलाभ होतो. सोबतच हिवाळ्यात पडणार्‍या थंडीशी सामना करण्याचे बळ मिळते.
निसर्गातील ऋतुपरत्वे मानवी शरीरावर होणार्‍या बदलांचा सुक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये आढळतो. असा सखोल व सुक्ष्म विचार क्वचितच दुसर्‍या शास्त्रामध्ये दिसून येतो. म्हणुन सणासुदीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीमध्ये लावून दिलेल्या चालीरितींमध्ये निश्चितच शास्त्रीय कारणे आहेत. म्हणुनच यासाठी आयुर्वेदीय सिद्धांत पडताळून बघण्याची आवश्यकता आहे.

डॉ मिलिंद सज्जनवार
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ
बि ए एम एस, डि वाय ए (पुणे)

श्री विश्वसाधना आयुर्वेद पंचकर्म योग चिकित्सालय
वर्धा | नागपूर | हिंगणघाट | यवतमाळ

अधिक माहितीसाठी संपर्क : 99755629004


०२ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
02/10/2025

०२ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

दसरा आणि विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!.
02/10/2025

दसरा आणि विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!.

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥दुर्गोत्सव आणि घटस्थापना निमित्त हार्दिक श...
22/09/2025

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

दुर्गोत्सव आणि घटस्थापना निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Address

195, Opp Wane Physiotherapy, Behind Sh*tal Mangal Karyalaya, Gandhinagar
Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishwaSadhana Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to VishwaSadhana Ayurveda:

Shortcuts

Share